Noise Pollution
Noise Pollution Dainik Gomantak
गोवा

Noise Pollution: ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी 'ग्लोरी वागातोर' हॉटेल व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात वाढत्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यातच उत्तर गोव्यातील हणजुणे बीच परिसरात सातत्याने रात्री उशिरापर्यंत पार्ट्या सुरू असतात. या पार्ट्यांमध्ये मोठ्या आवाजात संगीत लावलेले असते. त्याचा त्रास परिसरातील, गावातील नागरिकांना होत असल्याच्या तक्रारी वारंवार झाल्या आहेत.

अशाच पद्धतीच्या एका तक्रारीतून काही दिवसांपूर्वी हणजुणे येथील एका कॅफेच्या व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अशीच एक घटना पुन्हा एकदा घडली असून रात्री 10 नंतर कर्णकर्कश आवाजात म्युझिक वाजवून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी 'ग्लोरी वागातोर' या हॉटेलच्या व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तक्रारीच्या आधारे हणजूण पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापनाविरोधात सदर कारवाई केलीय.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Taleigao Election Result: ताळगावमधून युनायटेड ताळगावकरचा सुफडा साफ, मंत्री बाबूश यांचे पॅनल विजयी

Sattari News : सत्तरीत तालुक्यात नदी परिसरात जिलेटिनचा धोका वाढला; जलप्रदूषणाची शक्यता

Air Pollution: वायू प्रदूषणानं वाढवली चिंता! टाईप 2 डायबिटीजच्या रुग्णांमध्ये तब्बल एवढ्या टक्क्यांनी वाढ; संशोधनातून खुलासा

Goa Today's Live News Update: लाच, खंडणी प्रकरण! पिळगावकरांना न्यायालयीन कोठडी

Imran Khan Comeback: इम्रान खान नऊ वर्षांनंतर करणार कमबॅक, गोव्यात शूटिंग सुरू; आमिरचा कॅमिओ

SCROLL FOR NEXT