Goa Accident News
Goa Accident News 
गोवा

Goa Accidental Death: सिर्ली धर्मापूर येथे झालेल्या कारच्या अपघातात 29 वर्षीय युवकाचा मृत्यू

सुशांत कुंकळयेकर

Goa Accident News: सिर्ली धर्मापूर येथे रविवारी रात्री कारचालकाचा रस्त्याचा अंदाज चुकल्याने भरधाव कार झाडाला आदळली. यात जखमी चालक सत्या तोमर (29) याला इस्पितळात दाखल केले असता त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. भरधाव वेगात गाडी हाकल्याने वाहनावरील त्याचे नियंत्रण जाऊन हा अपघात घडला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

चालक सत्या तोमर हा मडगावातील चार्ली टेलर्सच्या मालकांचा मुलगा आहे. त्याला याआधी ऑगस्ट 2020 मध्ये दुचाकी चोरी प्रकरणात मडगाव पोलिसांकडून अटक करण्यात आलेली होती व त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाक्याही जप्त करण्यात आल्या होत्या अशी माहिती प्राप्त झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरवडे नावेली येथील रहिवासी सत्या राजकुमार तोमर हा 29 वर्षीय युवक चारचाकीने रात्री मडगावकडून कुंकळ्ळीच्या दिशेने जात होता. रात्री 1.15 वाजता चालकास रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी रस्त्याशेजारील झाडावर जाऊन आदळली.

या अपघातात चालक सत्या राजकुमार तोमर यास गंभीर दुखापत झाली व रक्तस्रावही झाला. त्याला उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

एकतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण गेले असावे किंवा त्याला वाहन चालवताना डुलकी लागली असावी, त्यामुळेच हा अपघात घडला असावा असा अंदाज मडगाव वाहतूक पोलिस निरीक्षक संजय दळवी यांनी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT