6 more deaths due to corona
6 more deaths due to corona 
गोवा

राज्यात कोरोनाचे आणखी सहा बळी

गोमंतक वृत्तसेवा

पणजी : राज्यात काल आणखी सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यंची संख्या ५८२ वर येऊन पोहचली आहे. काल दिवसभरात २९० लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे. ज्यामुळे राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या दोन हजार पाचशे सतरा इतकी झाली. काल ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्यातील चार व्यक्तींचा मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालयात, तर बाकी दोघांचा हॉस्पिसिओ रुग्णालय, मडगाव येथे झाला. यामध्ये ६८ वर्षी य मडगाव येथील पुरुष, म्हा पसा येथील ५८ वर्षी य पुरुष आणि ५८ वर्षी य महिला, बाणावली येथील ५२ वर्षी य पुरुष, फातोर्डा येथील ६४ वर्षी य महिला आणि मडगाव येथील ६८ वर्षी य पुरुष यांचा समावेश आहे.

कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर ९२.७१ टक्के झाला आहे. गेल्या चोवीस तासांत ३४३ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. दक्षिण आणि उत्तर गोव्यातील उलपब्ध खाटांची संख्या अद्यापही मोठ्या प्रमाणात शिल्लक असल्याने लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. उत्तर गोव्या त खाटांची  संख्या ४६९ इतकी असून सध्या ३६१ खाटा वापरात आहेत, तर दक्षिण गोव्या त ६९२ इतकी खाटांची संख्या असून सध्या ५१० खाटा वापरात आहेत.आजच्या दिवसभरात १४४ लोकांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वी कारला, तर १४४ लोकांना इस्पितळात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. आज दिवसभरात एक हजार ऐंशी इतके लाळेचे नमुने तपासण्यात आले. दरम्यान, डिचोली आरोग्य केंद्रा त ७९, म्हापसा आरोग्य केंद्रा त ९१, पणजी आरोग्य केंद्रात ११९, चिंबल आरोग्य केंद्रात १५२, पर्वरी आरोग्य केंद्रात १८०, मडगाव आरोग्य केंद्रात २२७, कुडतरी आरोग्य केंद्रात ३३, फोंडा आरोग्य केंद्रात १४३ इतके कोरोनाचे रुग्ण उपचार घेत असून राज्या त इतर ठिकाणीही रुग्ण आहेत.

पेडण्यात एकही पॉझिटि व्ह रुग्ण नाही
पेडणे तालुक्या त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. २३ रोजी फक्त एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता, तर काल २४, रविवारी ता. २५ रोजी व आज सोमवारी ता. २६ रोजी मि ळून तीन दिव स एकही कोरोना रुग्ण सापडलेला नाही ही पेडणे तालुक्या च्या दृष्टीने दि लासा देणारी बाब आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT