people drowned in goa
people drowned in goa Dainik Gomantak
गोवा

ओपा-ओकांबमध्ये 10 वर्षांत 25 बळी!

दैनिक गोमन्तक

पाळी : राज्यात विविध ठिकाणी पाण्यात बुडून मरण पावण्याच्या घटना सातत्याने होतच आहेत. त्यामुळे ही धोक्याची घंटा आहे. याप्रकरणी जागृती केली जात असली तरी अजूनही अशा दुर्घटना होतच आहेत.

विशेषतः दारू पिऊन दंगामस्ती करणारा युवावर्गच बळी पडत असल्याने त्यादृष्टीने व्यापक जागृती व्हायला हवी, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. गेल्या दहा वर्षांचा आढावा घेतला तर एकट्या खांडेपार नदीत 25 जणांना जलसमाधी मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. 2010 ते 2021 पर्यंतचा हा आढावा असून 2012 व 2015 मध्ये प्रत्येकी चारजणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

गोवा कॅनचे स्तुत्य कार्य!

गोवा कॅन या स्वयंसेवी संघटनेचे रोलँड मार्टिन्स व त्यांच्या सहकाऱ्यांकडून जलसमाधी रोखण्यासाठी सातत्याने जागृती केली जात आहे. दूधसागर तसेच खांडेपार नदीत गेल्या दहा वर्षांत पंचवीसजणांना जलसमाधी मिळणे ही अतिशय दुःखदायक बाब आहे, त्यामुळेच मार्टिन्स यांनी अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेऊन यासंबंधी जागृती करण्यावर भर दिला आहे.

16 ते 30 वयोगटातील युवकांना जलसमाधी

गेल्या दहा वर्षांत खांडेपार व दूधसागर नदीत बुडण्याच्या प्रकरणांचा आढावा घेतल्यास सोळा ते तीस वयोगटातील युवकांचाच जास्त समावेश असल्याचे उघड झाले आहे. या आढाव्यात दूधसागर धबधब्यावर जलसमाधी मिळालेल्यांचा समावेश नाही, अन्यथा हा आकडा पन्नाशी पार करील. खास करून पिकनिकसाठी येणाऱ्यांकडून नदीच्या पाण्याचे भान राहत नाही, त्यामुळेच या दूर्घटना घडल्या आहेत.

नदीत बुडणाऱ्यांत युवकांचे प्रमाण जास्त आहे. नदीत उतरताना पाणी किती आहे, किती खोल आहे, याचा अंदाज या युवकांना असत नाही. केवळ मौजमस्ती करण्याच्या हेतूनेच युवावर्ग अशा नद्यांवर येतात, आणि दूर्घटनेत बळी जातात, त्यासाठी प्रत्येकाने भान ठेवणे गरजेचे आहे.

- सी. एल. पाटील (पोलिस उपअधीक्षक, फोंडा)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

Goa Today's Live News:सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत - अमित पाटकर

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Video: ‘’प्रज्वल रेवण्णाला....’’; कर्नाटक सरकारमधील मंत्र्याच्या वक्तव्याने नव्या वादाला फुटले तोंड

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

SCROLL FOR NEXT