147 corona free in 24 hours in the state
147 corona free in 24 hours in the state 
गोवा

राज्यात चोवीस तासांत १४७ कोरोनामुक्त

दैनिक गोमंतक


पणजी : नोव्हेंबर महिन्यात तिसऱ्या दिवशी राज्यात कोरोनाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. यापूर्वी राज्यातील कोरोनाच्या बाबतची परिस्थिती सुधारत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. १२ नोव्हेंबर आणि १९ नोव्हेंबर रोजीही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला नव्हता.  गेल्या चोवीस तासात ११६ लोकांना कोरोनाची लागण झाली तर १४७ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत.

राज्यात सध्या एक हजार एकशे चाळीस इतके कोविडचे सक्रिय रुग्ण आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ९६.१२ टक्के इतका आहे.  उत्तर आणि दक्षिण गोव्यातील कोविड इस्पितळांमध्ये उपचारासाठी पुरेशी जागा शिल्लक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर गोव्यात खाटांची संख्या २७५ इतकी असून सध्या २०८ खाट वापरासाठी उपलब्ध आहेत तर दक्षिण गोव्यात २३२ इतकी खाटांची संख्या असून सध्या २१९ खाटा उपलब्ध आहेत. आज दिवसभरात ६० लोकांनी गृह अलगीकरणाचा पर्याय स्वीकारला तर २७ लोकांना इस्पितळात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT