traffic sentinel
traffic sentinel 
गोवा

साडेचारशे सेंटीनेलना १.२० कोटी मंजूर 

Dainik Gomantak

पणजी

पोलिस खात्याच्या वाहतूक पोलिस विभागातर्फे ट्राफिक सेंटीनेल (वाहतूक पहारेकरी) योजनेमुळे वाहनचालक नियमांचे पालन करू लागले. मात्र, या योजनेत सहभागी होऊन नोंदणी असलेल्या सेंटीनेलना वेळेवर मानधन मिळणे कठीण होत आहे. गेल्यावर्षीचे मानधन यावर्षी मंजूर झाले आहे. सुमारे साडेचारशे सेंटीनेल्सच्या खात्यावर ही १.२० कोटींची रक्कम जमा केली जाणार आहे. 
काही दिवसांपूर्वी एका ट्राफिक सेंटीनेलने मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. ट्राफिक सेंटीनेल योजनेखालील प्रत्येक सदस्याला त्याने वाहनचालकांनी नियमांचे उल्लंघन केलेल्याची छायाचित्रे पाठविल्यावर गुण जमा केले जातात. शंभर गुण झाल्यावर त्याच्या मोबदल्यात एक हजार रुपये दिले जातात. ही योजना २०१७ पासून सुरू आहे. सुरुवातीला या योजनेखाली सेंटीनेलना वेळेवर रक्कम दिली जात होती. त्यामुळे या योजनेकडे अनेकजण आकर्षित झाले. सध्या या योजनेखाली सुमारे आठ हजाराहून अधिकजण नोंदणी झालेले आहेत. गेल्या दोन वर्षापासून सेंटीनेलना त्यांच्या कामाचा मोबदला मिळालेला नाही. सरकार ही रक्कम मंजूर करत नाही, तोपर्यंत तिचे वितरण करणे शक्य नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जी १.२० कोटींची रक्कम सरकारने मंजूर केली आहे, ती गेल्या वर्षात सेंटीनेलने पाठविलेल्या छायाचित्रांनुसार मिळालेल्या गुणांची आहे. ही रक्कम सुमारे साडेचारशे सेंटीनेलना वाटप केली जाणार आहे. यावर्षीची ही रक्कम अजून सरकारकडे पाठविण्यात आलेली नाही. 
मिळालेल्या माहितीनुसार दोन वर्षापूर्वी दुचाकी चालक नियमांचे उल्लंघन करत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही योजना तत्कालीन पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी सुरू केली होती. लोकांना या योजनेत सहभागी करून दुचाकींना हेल्मेट सक्ती तसेच इतर नियमांचे उल्लंघन करण्यापासून रोखण्यासाठी त्याचा वापर करण्यात येत होता. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षात कमी झाली आहे. त्यामुळे दरदिवशी नियमांचे उल्लंघन केलेली किमान २०० छायाचित्रे पोलिस वाहतूक विभागाकडे येत असतात. त्याची वर्गवारी करून संबंधित पाठविणाऱ्या सेंटीनेलला गुण दिले जातात. त्यांचे गुण १०० झाल्यावर त्याला एक हजार रुपये लागू होतात. ही योजना फायदेशीर असल्याने अनेक तरुण त्यामध्ये सहभागी झाले आहेत. 
 

 goa goa goa 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT