BJP Government Formation
BJP Government Formation Dainik Gomantak
गोवा निवडणूक

25 मार्चपूर्वी गोव्यात सरकार स्थापन करणार, भाजपचं स्पष्टीकरण

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात सत्तास्थापनेवरुन भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आले आहेत. काँग्रेसच्या पत्रकार परिषदेनंतर आता भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. विजय मिळाल्यानंतरही अजून भाजपने गोव्यात सरकार स्थापन केलेलं नाही. मात्र आता गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंनी 25 मार्चपूर्वी गोव्यात भाजपचं सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केला आहे. 21 मार्च ते 25 मार्च दरम्यान सत्तास्थापनेसह मुख्यमंत्र्यांचा शपथविधीही पार पडणार आहे.

गोव्यात विधानसभा निवडणुकीत (Goa Election) भाजपला 40 पैकी 20 जागांवर विजय मिळाला आहे. तसंच तीन अपक्षांनीही भाजपलाच पाठिंबा दिला आहे. मगोपला भाजपमधून विरोध असला तरीही सत्तास्थापनेत मगोप सहभागी होण्याची शक्यता आहे. गोव्यासह विजय मिळालेल्या चारही राज्यात एकाचवेळी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी भाजप (BJP) नेत्यांचे प्रयत्न सुरु होते. मात्र एक दिवसाआड प्रत्येक राज्यात सरकार स्थापन केलं जाणार असल्याची माहिती आहे. भाजपचे बडे नेते या शपथविधी समारंभांना हजेरी लावणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

दरम्यान मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठीची सर्व तयारी झाली असून शुक्रवारपूर्वीच हा कार्यक्रम उरकला जाणार आहे. काही गोष्टींची पूर्तता येत्या 4 दिवसात केली जाईल आणि गोव्यात भाजपचं सरकार स्थापन होईल, असं तानावडेंनी (Sadanand Shet Tanavade) स्पष्ट केलं आहे. गोव्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आम्ही राज्यपालांना याची कल्पना दिलेली आहे. त्यामुळे काँग्रेसने याची काळजी करणं सोडावं. त्यांनी स्वत:चा पक्ष सांभाळावा, असा टोलाही तानावडेंनी लगावला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT