Will run until June 2021 Amazon's work from home
Will run until June 2021 Amazon's work from home 
ग्लोबल

जून २०२१ पर्यंत चालेल अ‍ॅमेझॉनचे वर्क फ्रॉम होम

गोमंतक वृत्तसेवा

न्यूयॉर्क : कोरोनाच्या जागतिक साथीमुळे घरून काम करण्याचा कालावधी पुढील वर्षी जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय अॅमेझॉनने घेतला आहे. ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी हे लागू आहे. 


अॅमेझॉनने प्रारंभी जानेवारीपर्यंत हा कालावधी नक्की केला होता. बाहेर पडून जोखमीचे काम करणाऱ्या १९ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे अॅमेझॉनने तीन आठवड्यांपूर्वी जाहीर केले होते. काही कर्मचारी, निर्वाचित अधिकारी तसेच कर्मचारी संघटनांनी अॅमेझॉनवर टीका केली होती. जागतिक साथ असूनही गोदामे उघडी ठेवून कर्मचाऱ्यांची प्रकृती धोक्यात घालत असल्याचा आरोप झाला होता.त्यावर अॅमेझॉनच्या प्रवक्त्याने सांगितले की, कार्यालयात येणाऱ्यांसाठी फिजीकल डिस्टन्सिंग, संपूर्ण स्वच्छता, मास्क वाटप, सॅनीटायझर अशा विविध उपायांसाठी आम्ही लक्षणीय निधी आणि स्त्रोतांची गुंतवणूक कोली आहे.

प्रमुख कंपन्यांचे धोरण
    ट्विटर : वर्क फ्रॉम होमसाठी कोणतीही कालमर्यादा नाही
    मायक्रोसॉफ्ट : आठवड्यातील कामकाजाचे निम्मे तास वर्क फ्रॉम होमची परवानगी
    फेसबुक : जुलै 2021 पर्यंत वर्क फ्रॉम होमचा निर्णय
    गुगल : जून 2021 पर्यंत वर्क फ्रॉम होमची परवानगी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT