Pakistan population
Pakistan population Dainik Gomantak
ग्लोबल

मुस्लिमांनी दुसऱ्या देशात जाऊन मुलं जन्माला घालावी: पाकिस्तानी मंत्र्याच्या वादग्रस्त वक्तव्याची जगभर चर्चा

दैनिक गोमन्तक

इस्लामाबाद: वाढत्या लोकसंख्येला तोंड देण्यासाठी पाकिस्तानचे आरोग्य मंत्री अब्दुल कादिर यांनी मोठे विधान केले आहे, ज्याची चर्चा पाकिस्तानातच नाही तर परदेशातही होत आहे. पाकिस्तानचे मंत्री अब्दुल कादिर म्हणाले की, 'ज्यांना जास्त मुले हवी आहेत त्यांनी पाकिस्तान सोडावे. त्यांना अशा देशांमध्ये जावून मुलं जन्माला घालावे जिथे मुस्लिम किंवा अल्पसंख्याकांची संख्या कमी आहे.'

वाढती लोकसंख्या चिंताजनक स्थिती

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त पाकिस्तानचे आरोग्य मंत्री अब्दुल कादिर पाकिस्तानच्या वाढत्या लोकसंख्येवर बोलत होते. अब्दुल कादिर म्हणाले की,'2030 पर्यंत पाकिस्तानची लोकसंख्या 285 दशलक्ष होणार आहे. म्हणजेच येत्या आठ वर्षांनी आपली लोकसंख्या 285 कोटी होईल. जी चिंताजनक बाब आहे. आम्ही अल्लाहचे आशीर्वाद कमी करण्याचा प्रयत्न करत नाही. आम्हाला मुस्लिमांना चांगले आरोग्य द्यायचे आहे त्याचबरोबर मुस्लिमांना सुशिक्षित आणि निरोगी बनवायचे आहे.'

लोकसंख्या रोखण्यासाठीचे उपाय अपुरे

पाकिस्तानमध्ये लोकसंख्या नियंत्रणाचे उपाय अत्यंत अपुरे ठरले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार, येत्या 28 वर्षांत पाकिस्तानची लोकसंख्या आजच्या तुलनेत 56 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तान हा जगातील अशा देशांपैकी एक आहे जिथे लोकसंख्या वाढीचा दर जागतिक दरापेक्षा जास्त आहे. अहवालानुसार, 2050 मध्ये पाकिस्तानची लोकसंख्या 360 दशलक्षचा आकडा पार करेल.

पाकिस्तान जगात पाचव्या क्रमांकावर

1990 मध्ये पाकिस्तानची लोकसंख्या केवळ 11.40 दशलक्ष होती. त्या काळात जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत पाकिस्तान आठव्या क्रमांकावर होता. मात्र अवघ्या 32 वर्षांनंतर आता तो पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. सध्या पाकिस्तानची लोकसंख्या 23 कोटी आहे. देशातील जन्मदरात अपेक्षित घट झाल्यामुळे लोकसंख्या वाढली आहे. जन्मदर कमी न झाल्यामुळे लोकसंख्या वाढ चिंतेची बाब म्हणून पाहिली जात आहे. मृत्युदर कमी झाल्यामुळे लोकसंख्या वाढली तर ते प्रगती किंवा विकासाचे लक्षण मानले जाते. पाकिस्तानमध्ये लोकसंख्या खूप जास्त आहे आणि संसाधने खूपच कमी आहेत.

पुढील वर्षी भारत अव्वल स्थानी

पाकिस्तानचा प्रजनन दर 3.40 आहे, तर भारताचा 2.20 आणि बांगलादेशचा 2.10 आहे. जागतिक स्तरावर हा आकडा 2.40 आहे. नुकतेच संयुक्त राष्ट्रसंघाने लोकसंख्येवर जारी केलेल्या अहवालात या वर्षी नोव्हेंबरमध्ये जगाची लोकसंख्या 8 अब्जांवर जाईल असे म्हटले आहे. या अहवालानुसार, भारत पुढील वर्षी सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये अव्वल स्थानावर येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत चीन हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होता पण भारत पुढील अनेक वर्षे पहिल्या नंबरवर राहण्याची शक्यता आहे. आणि भारताच्या भविष्याच्या दृष्टिने ही खूप मोठी चिंतेची बाब आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT