fishermen
fishermen 
ग्लोबल

श्रीलंकेच्या मासेमारांनी केलेत भारतीय नौदलावर गंभीर आरोप

दैनिक गोमंतक

श्रीलंकेच्या (sri lanka )स्थानिक सामाजिक माध्यमांमध्ये भारतीय नौदलाने (Indian Navy) श्रीलंकेच्या मासेमाऱ्याना पकडल्याच्या आरोपाखाली भारतीय संघाने "खोटे" म्हटले आहे. मात्र अशी कोणतीही घटना घडलेली नाही , असे भारताने म्हटले आहे. श्रीलंकेच्या 13 स्थानिक मासेमारी करणाऱ्या गटाने 7 मे रोजी 'तूफान 1 ' आणि 'तुषान 2' या मासेमारी जहाजांवर दाखल झाल्याचा दावा केला आहे.  (Sri Lankan fishermen have levelled serious allegations against the Indian Navy)

भारतीय उच्चायोग काय म्हणाले ? 

भारतीय उच्च योगाने म्हटले आहे की, 1 जून रोजी माध्यमांनी दिलेल्या वृतानुसार भारतीय नौदलाने श्रीलंकेच्या मासेमारी करणाऱ्या गटावर हल्ला केला , हा खोटा आरोप केला  आहे. अशी कोणतीही घटना घडलेलीच नाही. ते म्हणाले की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील मासेमारी करणाऱ्यांच्या संबंधित सर्व प्रश्न उपस्थित करून द्विपक्षीय प्रणाली आणि कराराद्वारे मानवी पद्धतीने सोडवण्यास कटिबंध आहे. 

मासेमाऱ्यांचा प्रश्न 

कथित घटनेची माहिती प्रसार माध्यमासमोर आल्यानंतर मत्सव्यवसाय मंत्रालयाने सचिव इंदु रथनायक यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले  की या अहवालाची छाननी केल्यावर 
भारताची चर्चा केली जाईल. यापूर्वी श्रीलंकेच्या नौदलाने श्रीलंकेच्या सीमेजवळ मासेमारीसाठी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप अनेक भारतीय मासेमारी करणाऱ्यांनी 
केला आहे. या घटनेनंतर मासेमारीचा प्रश्न चिंतेचा विषय बनला आहे. 


 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT