Elon Musk
Elon Musk  Dainik Gomantak
ग्लोबल

Bankruptcy In US: जनतेने आपला खर्च कमी करावा अन्यथा... मस्क यांचा अमेरिकेला दिवाळखोरीचा इशारा

Ashutosh Masgaunde

जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेवर अर्थिक संकटाचा धोका आहे. याबाबतचा इशार टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी दिला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत त्यांनी येथील अमेरिकन नागरिकांना कमी खर्च करण्याचा सल्ला दिला आहे.

एक्स वरील एका यूजरने पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, कधीतरी अमेरिकन करदात्यांच्या पैशांपैकी 100 टक्के रक्कम राष्ट्रीय कर्जावरील व्याज भरण्यासाठी वापरली जाईल.

यावर प्रतिक्रिया देताना इलॉन मस्क म्हणाले, 'अमेरिका लवकरच दिवाळखोरीत निघू शकते. येथील जनतेने आपला खर्च कमी करावा अन्यथा ते लवकरच कंगाल होतील.

एका यूजरने पोस्टमध्ये म्हटले आहे की, पुढील काही वर्षे हे आकडे पाहणे औत्सुक्याचे आहे. सरकारच्या महसुलात वैयक्तिक आयकराचा वाटा जवळपास निम्मा आहे. फेब्रुवारीबद्दल बोलायचे तर, अमेरिकन सरकारने वैयक्तिक आयकरातून 120 अब्ज डॉलर्स गोळा केले. राष्ट्रीय कर्जावरील व्याज देण्यासाठी त्यांना फेब्रुवारीमध्ये $76 अब्ज खर्च करावे लागले. तो दिवस दूर नाही जेव्हा कर्जावरील व्याजासाठी 100 टक्के वैयक्तिक आयकर भरावा लागेल.

यावर मस्क यांनी एका ओळीत आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, जादा खर्च करणे थांबले पाहिजे अन्यथा अमेरिका लवकरत दिवाळखोर होईल.

अमेरिकेतील अब्जाधीश बँकर जेमी डिमन म्हणतात की, अमेरिकेत मंदी येण्याची शक्यता फार दूर नाही. त्याच वेळी, जेपी मॉर्गन चेसचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, 'मला वाटते की पुढील एक किंवा दोन वर्षांत सॉफ्ट लँडिंगची शक्यता निम्मी आहे. सर्वात वाईट परिस्थिती स्टॅगफ्लेशन असेल.

जेमी डिमन यांनी व्याजदर कमी करायचे की नाही याविषयी यूएस फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाचे स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, कोरोना महामारीमुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. युनायटेड स्टेट्समध्ये बेरोजगारी सध्या खूपच कमी आहे, वेतन वाढत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT