जपान हा शांतताप्रिय देश म्हणून ओळखला जातो. मात्र आता जपानने अशी काही पाऊले उचलली आहेत. ज्यामुळे चीन चिंतागस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. जपानने संरक्षण तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणावरील बंदी उठवल्यानंतर चीनने आपली चिंता व्यक्त केली आहे. ही बंदी हटवल्याने जपानच्या प्रगत लढाऊ विमानांच्या निर्यातीला परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
इटली आणि ब्रिटनच्या सहकार्याने टोकियो ही लढाऊ विमाने तयार करत आहे. जपानने उचललेल्या या पाऊलामुळे चीन इतका अस्वस्थ झाला आहे की, जगाला जपानच्या इतिहासाची आठवण करून देऊ लागला आहे. चीनने संबंधित अहवालाची दखल घेतली आहे आणि या निर्णयावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या नेतृत्वाखालील सरकारने संरक्षण उपकरणे आणि तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणावरील सुधारित निर्यात नियमांना मंजुरी दिली, असे जपान टाइम्सने वृत्त दिले आहे. या नियमांवर सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाला त्यांच्या सहयोगी कोमिती पक्षाचाही पाठिंबा होता. सुधारित नियमांनुसार टोकियो संयुक्तपणे विकसित होत असलेल्या लढाऊ विमानांची निर्यात करू शकते.
2035 पर्यंत तिसऱ्या देशात तैनात केले जाण्याची अपेक्षा आहे. जपानचे संरक्षण मंत्री मिनोरू किहारा म्हणाले की, लढाऊ विमानांच्या विकासाचे काम सध्या डिझाइनच्या टप्प्यात आहे आणि पुढील पाच वर्षांमध्ये तपशील आणि कामगिरीचा मसुदा तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जपानचे संरक्षण मंत्र्यांनी असे स्पष्ट केले आहे की, ही लढाऊ विमाने युद्ध सुरू असलेल्या देशाला विकली जाणार नाहीत.
जपान पॅसिफिक, आग्नेय आशिया आणि दक्षिण आशियातील बीजिंगच्या प्रतिस्पर्ध्यांना ही लढाऊ विमाने विकेल, अशी चीनची भीती आहे. बीजिंग विशेषत: शेजारच्या देशाबद्दल चिंतित आहे, जिथे जपानने इंडोनेशिया, फिलीपिन्स, व्हिएतनाम आणि मलेशिया यांच्याशी संरक्षण संबंध मजबूत करण्यासाठी 10 वर्षांचा नवीन रोडमॅप तयार केला आहे.
चीनची चिंता त्याच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वक्तव्यातूनही दिसून येते. जपान आपल्या सुरक्षा धोरणात कठोर बदल करत आहे आणि संरक्षण खर्च वर्षानुवर्षे वाढवत आहे. शस्त्रास्त्रांच्या निर्यातीवरील निर्बंध शिथिल करणे. या पावलांमुळे जपानचे शेजारी देश आणि आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
चीनचे प्रवक्ते लिन जियान यांनी जपानला शेजारील देशांच्या सुरक्षेच्या चिंतेचा प्रामाणिकपणे आदर करावा आणि आपल्या आक्रमकतेच्या इतिहासावर खोलवर विचार करावा असे आवाहन केले. जपानने शांततापूर्ण विकासाच्या मार्गासाठी स्वतःला वचनबद्ध केले पाहिजे आणि आपल्या कृतींद्वारे आशियाई शेजारी आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचा विश्वास संपादन केला पाहिजे, असे ते म्हणाले. बीजिंगने आपले आक्रमक धोरण स्वीकारत चीन समुद्र आणि तैवान सामुद्रधुनीवर दावा केला आहे. आता जपान यावर काही उत्तर देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.