Terrorists
Terrorists Dainik Gomantak
ग्लोबल

इस्रायली न्यायालयाचा मोठा निर्णय, 'Terrorists चे नागरिकत्व रद्द करा'

दैनिक गोमन्तक

Israel: सर्वोच्च न्यायालयाने दहशतवाद आणि देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्यांचे नागरिकत्व रद्द करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. एससी चीफ एस्थर ह्युट यांच्या नेतृत्वाखालील सात न्यायाधीशांच्या समितीने या संदर्भात निर्णय दिला. देशविरोधी कारवाई केल्याप्रकरणी एक व्यक्ती दोषी आढळल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. असे दोषी जे दहशतवाद, देशद्रोह, हेरगिरी किंवा शत्रू पक्षात सामील झाल्याचे आढळून आल्यास त्यांचे नागरिकत्व रद्द केले जाऊ शकते.

दरम्यान, दोषींचे नागरिकत्व रद्द झाल्यानंतर त्यांना देशात राहण्याची परवानगी देण्यासाठी त्यांना निवास परवाना देण्याची तरतूद असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, दोन सौदी नागरिकांचे (Citizen) नागरिकत्व नाकारण्याचे आवाहन गृह मंत्रालयाकडे करण्यात आले होते. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निर्णय दिला. हे दोघेही वेगवेगळे हल्ले केल्याप्रकरणी दोषी आढळल्याची माहिती आहे.

या आरोपींच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान हा निर्णय आला

मोहम्मद मफ्राझा आणि अला जिउद अशी या दोन सौदी नागरिकांची नावे आहेत. मोहम्मद मफ्राझा 2012 मध्ये तेल अवीवमध्ये दोषी आढळला होता. त्याच वेळी, 2015 मध्ये अला जिउदने उत्तर इस्रायलमधील सॅम्युअल जंक्शन येथे नागरिकांवर चाकूने हल्ला केला, ज्यामध्ये चार लोक जखमी झाले होते. त्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.

दगडफेक करणाऱ्यांवर ही कारवाई होणार का?

इस्रायलच्या (Israel) कायदेशीर विभागातील असोसिएशन फॉर सिव्हिल राइट्सचे संचालक ओडेड फेलर यांनी एससीच्या निर्णयाबद्दल सविस्तर सांगितले. ते म्हणाले की, 'सर्वोच्च न्यायालय राज्याप्रती निष्ठेचे उल्लंघन केल्याबद्दल नागरिकत्व रद्द करण्याचे आदेश देत ​​आहे. परंतु, याचा अर्थ असा नाही की, प्रत्येक दगडफेक करणार्‍याचे नागरिकत्व रद्द केले जाईल.'

सर्व काही गृहमंत्र्यांच्या हातात असेल का?

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) नव्या आदेशात नागरिकत्व रद्द करण्याबाबतही अनेक बंधने घालण्यात आली आहेत. तरीही, फेलर याबद्दल चिंतित आहे. अंतिमत: गृहमंत्र्यांच्या निर्णयाच्या आधारेच नागरिकत्वाचा निर्णय होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत त्याचा गैरवापर होण्याचीही शक्यता आहे. गृहमंत्री आयलेट शेक यांनीही एका निवेदनात म्हटले आहे की, 'दहशतवाद्यांचे (Terrorists) इस्रायली नागरिकत्व रद्द करण्यासाठी सरकार प्रयत्नरत असेल.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT