Israel has full right to self defense Biden
Israel has full right to self defense Biden 
ग्लोबल

स्वसंरक्षणाचा इस्त्रयलला पूर्ण अधिकार: बायडन

गोमंन्तक वृत्तसेवा

हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना (Hamas Terrorist Organization ) आणि इस्त्रायल (Israel) लष्कर यांच्यात सुरु असणाऱ्या संघर्षाच्या पाश्वभूमीवर आता अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बायडन यांनी इस्त्रायल आणि हमास या दहशतवादी संघटना यांच्यात सुरु असलेल्या संघर्षासंदर्भात भाष्य करताना इस्त्रायला आपलं स्वसंरक्षणाचा पूर्ण स्वतंत्र असा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. बुधवारी रात्री राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. 2014 नंतरचा गाझापट्ट्यामध्ये इस्त्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेमध्ये सर्वात मोठा संघर्ष उफाळून आला आहे. जो बायडन यांनी व्हाईट हाऊसमध्ये प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना, ‘’हा संघर्ष लवकरच संपेल अशी मी आशा करतो,’’ असं स्पष्ट केलं तसेच, ‘’जेव्हा इस्त्रायलच्या सीमा ओलांडून हजारो रॅकेट त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी येत असतील तर त्यांना स्वता:च संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे,’’ असंही बायडन म्हणालेत. (Israel has full right to self defense Biden)

हमास आणि इस्त्रायल यांच्यात सुरु असलेला संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेने आपले राजकीय दूत कतार आणि इजिप्तमध्ये पाठवले आहेत. संवादाच्या माध्यमातून हा चालू असलेला संघर्ष शांत करण्यासाठी अमेरिका प्राधान्य देणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हमासने इस्त्रायलवर रॉकेटच्या माध्यमातून हल्ले केले आहेत. तर इस्त्रायलनेही जशाच तसं उत्तर देत हमासवर एअर स्ट्राइक केला आहे. दोन्हीकडून करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 60  लोकांचा मृत्यू झाला आहे. सोमवारपासून इस्त्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष सुरु आहे या संघर्षात सर्वाधिक पॅलिस्टीनी लोकांचा मृत्यू झाला. तर इस्त्रायलच्या सहा लोकांचा मृत्यू झालाय. बुधवारी रात्री हमासकडून इस्त्रायलमधील तेलअविव शहरावर हल्ला केला आहे. तेलअविव (Tel Aviv) हे इस्त्रायलमधील आर्थिकदृष्ट्या संपन्न असं शहर आहे.

या संदर्भात बोलताना इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी हमासला आक्रमक पवित्र्याची मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचा इशारा दिला आहे. इस्त्रायलने हमासला जशाच तसं उत्तर देताना गाझापट्ट्यातील इमारतींवर हल्ले केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांनी बुधवारी कतारचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद बिन अब्दुलरहमान यांच्याशी संवाद साधला आहे.

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला इशारा दिला आहे की ही तर केवळ सुरुवात आहे. येत्या काही दिवसामध्ये हमासच्या काही वरिष्ठ कमांडर्सला लक्ष्य करणार आहोत, असंही नेतन्याहू यांनी सांगितलं आहे. इस्त्रायल आणि हमासमधील या युध्दामुळे जगभरात दोन गट पडले आहेत. एकीकडे इराणसहीत सगळे इस्लामिक देशांनी इस्त्रायलवर टीका केली असतानाच दुसरीकडे अमेरिकेने इस्त्रायलचं समर्थन केलं आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT