India-Taiwan Relations Dainik Gomantak
ग्लोबल

India-Taiwan Relations: चीनला लागणार मिर्ची! भारत तैवानला पाठवणार एक लाखाहून अधिक कामगार

India Taiwan Signing MOU For One Lakh Workers: भारत सातत्याने तैवानशी आपले आर्थिक संबंध घनिष्ठ करत आहे.

Manish Jadhav

India Taiwan Signing MOU For One Lakh Workers: भारत सातत्याने तैवानशी आपले आर्थिक संबंध घनिष्ठ करत आहे. यातच आता, भारत तैवानला सुमारे एक लाख कामगार पाठवण्याची तयारी करत आहे. यासाठी डिसेंबर 2023 च्या सुरुवातीला भारत-तैवानमध्ये करार होणे अपेक्षित आहे.

दरम्यान, हा निर्णय का घेतला जात आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. चला तर मग जाणून घेऊया यामागील महत्त्वाचे कारण. तैवानची मोठी लोकसंख्या 2025 पर्यंत वृद्ध होणार आहे आणि भारतात तरुणांची खूप मोठी लोकसंख्या आहे. जी तैवानची मोठी गरज पूर्ण करु शकते, परंतु भारताच्या या निर्णयामुळे चीनला मिर्ची लागण्याची शक्यता आहे.

जो भारत-तैवान संबधाला विरोध करतो. दुसरीकडे, भारत कामगार-संबंधित कराराद्वारे तैवानशी घनिष्ठ आर्थिक संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

अधिकार्‍यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, तैवान हॉस्पिटलमध्ये काम करण्यासाठी एक लाखाहून अधिक भारतीयांना रोजगार देऊ शकतो.

तैवान 2025 पर्यंत 'सुपर एज्ड' देश बनेल

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी सांगितले की, 'भारत-तैवान रोजगार करार आता वाटाघाटीच्या अंतिम टप्प्यात आहे.' मात्र, ब्लूमबर्ग न्यूजने संपर्क साधला असता तैवानच्या श्रम मंत्रालयाने या करारावर कोणतेही भाष्य केले नाही, परंतु ते म्हणाले की आपल्या लोकांसाठी कामगार प्रदान करणार्‍या देशांच्या सहकार्याचे स्वागत आहे.

2025 पर्यंत तैवान (Taiwan) एक 'सुपर एज्ड' देश बनेल, ज्यात वृद्ध लोकांचा लोकसंख्येच्या पाचव्या भागापेक्षा जास्त वाटा अपेक्षित आहे. तेथील बेरोजगारीचा दर 2000 नंतरच्या नीचांकी पातळीवर आला आहे.

अशा परिस्थितीत, तैवान सरकारला आपली 790 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था चालू ठेवण्यासाठी कामगारांची गरज आहे. तैवान भारतीय कामगारांना चांगला पगार आणि विमा पॉलिसीही देत ​​आहे.

गलवान संघर्षानंतर भारत-चीन संबंध बिघडले

दुसरीकडे, चीनला (China) मागे टाकत भारत यावर्षी जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला आहे. आतापर्यंत, भारत सरकारने जपान, फ्रान्स आणि यूकेसह 13 देशांशी रोजगार करार केले आहेत. नेदरलँड, ग्रीस, डेन्मार्क आणि स्वित्झर्लंड यांच्याशी तत्सम व्यवस्थेची चर्चा सुरु आहे.

दरम्यान, चीन तैवानला आपलाच भूभाग मानतो. एक प्रकारे तैवान समुद्रमार्गे चीनला लागून आहे आणि हिमालयमार्गे भारताला लागून आहे. गेल्या दोन दशकांपासून हा भारताचा आयातीचा सर्वोच्च स्रोत आहे.

त्याचवेळी, 2020 मध्ये सीमेवर झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीनमधील संबंध तणावपूर्ण आहेत, जी 4 दशकांतील आतापर्यंतची सर्वात वाईट स्थिती आहे.

त्यानंतर दोन्ही देशांनी हजारो सैन्य, तोफखाना आणि रणगाडे हिमालयाच्या प्रदेशात हलवले आहेत. आता तैवानचा मुद्दा उपस्थित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT