Gates Divorce How the division of property will take place
Gates Divorce How the division of property will take place 
ग्लोबल

Gates Divorce: समाज कल्याणासाठी देणार संपत्तीचा मोठा हिस्सा

गोमंन्तक वृत्तसेवा

वॉशिंग्टन: बिल गेट्स(bill gates) आणि मेलिंडा गेट्सच्या(melinda gates) घटस्फोटानंतर(Gates Divorce) त्यांच्यात संपत्ती वरून वाद होणे अशक्य आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे दोघांकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे. दुसरे म्हणजे, दोघांनी आधीच सांगितले आहे की ते त्यांच्या संपत्तीच्या एक मोठा भाग समाज कल्याणासाठी देणार आहेत. परंतु, घटस्फोटाच्या बसण्यासारखे त्यांच्याकडे एक पण कारण नाही किंवा  सेपरेशन कॉन्ट्रैक्ट त्यांच्यात नाही.

मेलिंडा गेट्सने या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. तज्ञांचे म्हणणे आहे की जर या घटस्फोटाचा अतिशय मनापासून भावनांचा आदर करत हा करार झाला आण मतभेद किंवा आक्षेप न घेतल्यास पुढे जाण्यात किंवा अंमलबजावणी करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. मात्र असा करार कोर्टावर बंधनकारक नाही. विशेषत: जोपर्यंत कोर्टाला जोपर्यत असे वाटत नाही की घटस्फोट घेणाऱ्या एका पक्षाकडे दुर्लक्ष झाले आहे. म्हणजेच, तज्ञ असे देखील म्हणतात की असा करार क्वचितच हाय स्टेटस असणारऱ्या जोडप्यांच्या घटस्फोटामध्ये घडतात, जेथे मालमत्तेची वाटणी करणे खूपच क्लिष्ट असू शकते.

सीएनएनच्या अहवालात सेलिब्रिटी तलाकचे वकील विल्यम ब्रेस्लो म्हणाले की, बिल आणि मेलिंडा गेट्सचा घटस्फोट शंभर टक्के मैत्रीपूर्ण आहे, आपल्या लग्नाच्या काळात जसे ते जगले होते तसेच घटस्फोटानंतरही ते सभ्य पद्धतीने जीवन जगतील. असे संकेत चारही मिळत आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीशच्या निर्देशांकानुसार 4 मे रोजी बिल गेट्सची 145 अब्ज डॉलर्सची संपत्ती होती. अशा परिस्थितीत पैशासाठी वाद होण्याची शक्यता कमीच आहे.

बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांनी मंगळवारी घटस्फोटाची घोषणा केली होती आणि त्यांनी 27 वर्षांचे संबध त्यांच्या वैवाहीक जीवनात वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी ही माहिती आपल्या ट्विटर वर पोस्ट शेअर करून दिली होती.

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल (65) आणि मेलिंडा (56) यांची कामानिमित्त एका कंपनीत भेट झाली होती. मेलिंडाने 1987 मध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून काम केले आहे, तेव्हाच दोघांची एकमेकांसोबत भेट झाली होती. काही वर्ष एकमेकांसोबत वेळ घालवल्यानंतर दोघांनी 1994 मध्ये हवाई येथे लग्न केले. यांना तीन मुलं आहेत. या संघटनेने निवेदनात म्हटले आहे की हे दोघेही त्यांचे सहकारी व विश्वस्त राहतील आणि दोघांमध्ये घटस्फोट झाल्यामुळे संघटनेत बदल होण्याची कोणतीही शक्यता नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

Arjun Parab Passed Away: ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन परब यांचे निधन

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

SCROLL FOR NEXT