Joe biden.jpg
Joe biden.jpg 
ग्लोबल

Corona Vaccination : लसीचे उत्पादन वाढविल्यास भारत ठरेल 'गेम चेंजर'

दैनिक गोमंतक

वॉशिंग्टन : भारताने कोरोना लसीचे (Corona Vaccine) उत्पादन (Production) वाढविले तर, तो जगात पुढे जाऊन एक गेम चेंजरची (Game Changer) भूमिका बजावू शकतो. असे अमेरिकेचे (America) राष्ट्रपती जो बाइडेन (Joe Biden) यांनी सांगितल्याची माहिती अमेरिकेच्या ( विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी दिली आहे. 

प्राईस म्हणाले, कोरोनाचा भारताला जास्त फटका बसला आहे. भारतात असे कोणीच राहिलेले नाही ज्यांना या महामारीचा फटका बसलेला नाही. यासाठीच आम्हाला वाटते की भारताने लसीचे उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. 

प्राईस यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेचे अध्यक्ष बाइडेन म्हणाले, भारतामध्ये लस निर्मितीची क्षमता वाढवून गेम चेंजर बनण्याची क्षमता आहे. यावेळी बोलताना त्यांनी क्वाडच्या बैठकीचे उदाहरण दिले. ते म्हणाले, भारताने लस निर्मितीला गती दिली पाहिजे. लसीची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी भारताला आर्थिक मदतीची चर्चा देखील झाली आहे. या बैठकीमध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका सहभागी झाले होते. यामध्ये हे देखील ठरविण्यात आले की, लस उत्पादनाची क्षमता वाढविण्यात सर्व देश भारताला मदत करतील. यासाठी अमेरिका दीर्घ काळासाठी 50 कोटी डॉलर्सची मदती करेल. याशिवाय या बैठकीत अतिरिक्त १० कोटी डॉलर्स देण्याचेही सांगण्यात आले आहे. 

प्राईस यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनीही सांगितले की, अमेरिकन सरकारसह खाजगी क्षेत्रातही भारताला पाठिंबा देण्यास तयार आहे. भारताच्या गरजेनुसार 50 कोटी डॉलर्सची मदत देण्यास आम्ही तयार आहोत. जगातील विविध देशांमध्ये कोरोना लसीचे 1.5 कोटी डोस उपलब्ध असून, त्यात भारताचा देखील समावेश आहे. याशिवाय या महिन्याच्या अखेरीस सुमारे 5.5 कोटी लसींचे डोस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

Goa Today's Live News:सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत - अमित पाटकर

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Video: ‘’प्रज्वल रेवण्णाला....’’; कर्नाटक सरकारमधील मंत्र्याच्या वक्तव्याने नव्या वादाला फुटले तोंड

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

SCROLL FOR NEXT