Protein
Protein 
ग्लोबल

कोरोना विषाणूच्या प्रोटिनची पुनर्रचना

PTI

ह्यूस्टन

 मानवी शरीरात प्रवेश करणाऱ्या आणि आतील पेशींना संसर्ग पोचवणाऱ्या कोरोनाच्या विषाणूंमधून मुख्य प्रोटिनची पुनर्रचना शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत केली आहे. या नव्या शोधामुळे कोरोनावरील लसीचे उत्‍पादन वेगात आणि स्थिर पद्धतीने होण्यास मदत होणार आहे. या प्रोटिनला ‘हेक्साप्रो’ असे नाव दिले आहे.
अमेरिकेतील ऑस्टिनमधील टेक्सास विद्यापीठातील संशोधकांनी म्हणण्यानुसार कोरोनाच्या मुख्य प्रोटिनचे अस्तिस्त मानवी रोगप्रतिकारक प्रणालीतून जाणवावे, असे प्रयत्न कोरोनावरील लसींच्या संशोधनात होत आहेत. या संबंधी ‘सायन्स’ या नियतकालिकामध्ये लेख प्रसिद्ध झाला असून त्यातील माहितीनुसार शास्त्रज्ञांनी या प्रोटिनची नवी रचना तयार केली आहे. सध्‍याच्या विविध लसींमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘एस’ प्रोटिनपेक्षा हे नवे प्रोटिन पेशीत दहापटीने जास्त तयार होऊ शकते. या प्रोटिनमुळे लसीच्या प्रकारांनुसार त्याच्या प्रत्येक मात्रेचे प्रमाण कमी होऊ शकते किंवा लसींचे उत्पादन वेगाने होण्यास मदत होऊ शकेल आणि अधिकाधिक रुग्णांना लस लवकर उपलब्ध होऊ शकेल, असे या अभ्यासलेखाचे मुख्य लेखक जॉन्सन मॅक्सलेलन यांनी सांगितले.

अँटिबॉडिज चाचणीसाठी मदत
संशोधकांच्या मतानुसार कोरोनाच्या अँटिबॉडिज चाचणीत ‘हेक्साप्रो’चा वापर केला जाऊ शकतो. रुग्णाला पूर्वी विषाणूचा संसर्ग झाला आहे का हे निदर्शनास आणून त्याच्या रक्तात अँटिबॉडिज आहेत की नाही हे तपासण्यासाठी या प्रोटिनचा उपयोग होऊ शकतो.

संपादन - अवित बगळे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT