King Charles Diagnosed With Cancer  Dainik Gomantak
ग्लोबल

King Charles Diagnosed With Cancer: किंग चार्ल्स यांना कर्करोगाची लागण, बकिंगहॅम पॅलेसची माहिती

King Charles Diagnosed With Cancer: बकिंगहॅम पॅलेसच्या वतीने याबाबत निवेदन जारी केले आहे.

Pramod Yadav

King Charles Diagnosed With Cancer: किंग चार्ल्स यांना कर्करोगाची लागण झाल्याचे समोर आले आहे. बकिंगहॅम पॅलेसच्या वतीने सोमवारी (दि.05) याबाबत निवेदन जारी केले आहे.

बकिंगहॅम पॅलेसने जारी केलेल्या निवेदनात किंग चार्ल्स एका प्रकारच्या कर्करोगाने ग्रस्त असल्याची माहिती देण्यात आली आहे. हा प्रोस्टेट कर्करोग नाही, परंतु अलीकडेच वाढलेल्या प्रोस्टेट ग्रंथीच्या उपचारादरम्यान याबाबत माहिती समोर आली. कर्करोगाचा प्रकार अद्याप समोर आलेला नाही.

किंग चार्ल्स यांना नियमित उपचारादरम्यान कर्करोग झाल्याचे निदान झाले. यामुळे डॉक्टरांनी चार्ल्स यांना सार्वजनिक ठिकाणी कोणतेही काम करण्याची परवानगी नाकारली आहे. मात्र, या काळात ते अधिकृतपणे आवश्यक कामासाठी उपलब्ध असतील.

किंग चार्ल्स यांना कॅन्सर झाल्याचे वृत्त कळताच ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. चार्ल्स लवकरच बरे होतील यात मला शंका नाही, असे त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटले आहे.

राणी एलिझाबेथ II च्या मृत्यूनंतर, किंग चार्ल्स तिसरे वयाच्या 73 व्या वर्षी ब्रिटनचे राजे झाले होते. गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांचा राज्याभिषेक झाला होता. यानंतर त्यांना राजा चार्ल्स तिसरा असे संबोधले जाते.

किंग चार्ल्स यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी बकिंगहॅम पॅलेस येथे झाला. आई राणी एलिझाबेथ II यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा ते 4 वर्षांचे होते. 1969 मध्ये, वयाच्या 20 व्या वर्षी, त्यांची राणीने कॅर्फर्नॉन कॅसल येथे प्रिन्स ऑफ वेल्स म्हणून नियुक्ती केली.

चार्ल्स यांनी 29 जुलै 1981 रोजी लेडी डायना स्पेन्सर यांच्याशी लग्न केले. त्यांना प्रिन्स विल्यम आणि प्रिन्स हॅरी अशी दोन मुले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT