From April 9 people from Pakistan Bangladesh Kenya and the Philippines will not be able to travel to Britain
From April 9 people from Pakistan Bangladesh Kenya and the Philippines will not be able to travel to Britain 
ग्लोबल

9 एप्रिलपासून पाकिस्तान आणि या तीन देशांचे लोक ब्रिटनमध्ये जाऊ शकणार नाहीत

गोमन्तक वृत्तसेवा

ब्रिटन (Britain) सरकारने कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus)  प्रादुर्भावाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश, केनिया, पाकिस्तान (Pakistan) आणि फिलिपिन्स या चार देशांना  इंग्लंडमध्ये (England) बंदीच्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे. परिवहन विभागाने सांगितले की ब्रिटनमधील नवीन निर्बंध 9 एप्रिलपासून अंमलात येणार आहेत. प्रवासी निर्बंधाच्या अटीनुसार, आंतरराष्ट्रीय प्रवाशांना येत्या दहा दिवसांत या देशांतून बाहेर जाता किंवा प्रवेश करता येणार नाही. (From April 9 people from Pakistan Bangladesh Kenya and the Philippines will not be able to travel to Britain) 

ब्रिटन आणि आयर्लंडमधील नागरिक आणि ज्यांना यूकेमध्ये राहण्याचा हक्क आहे ते लोकं प्रवेश करु शकतात परंतु त्यांना स्वखर्चाने शासकीय मान्यताप्राप्त हॉटेलमध्ये दहा दिवस क्वारंटाइल राहणे आवश्यक असणर आहे. ब्रिटनवरील प्रवासी निर्बंधाच्या यादीमध्ये आता 39 देश आहेत. यामध्ये ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे, जिथे व्हायरसचे दोन नवीन प्रकार सापडले आहेत.

सोमवारी, इंग्लंडमध्ये लागू करण्यात आलेला कठोर लॉकडाउन वर्षाच्या सुरुवातीला शिथिल झाला होता, त्यामुळे आता लोक घराबाहेर पडू शकतात, त्यांच्या कुटुंबांना आणि मित्रांना भेटू शकतात, उद्यानात जाऊ शकतात, खेळू शकतात. नवीन नियमांनुसार मैदानी खेळाच्या आस्थापने पुन्हा उघडता येतील आणि जास्तीत जास्त सहा किंवा दोन लोक बागांमध्ये एकत्र येऊ शकतात.

पंतप्रधान म्हणाले, 'नियमांचे पालन करा'
पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी जनतेला सावध राहण्याचे आवाहन केले आहे. लॉकडाऊनचे नियम शिथील करतांना ते म्हणाले की, प्रत्येकाने दिलेल्या सवलतीत नियमांचे पालन केले पाहिजे. हात धुणे, मास्क लावणे, अंतर ठेवणे काळजीने केले पाहिजे. अधिकृत आकडेवारीनुसार, 30 दशलक्षाहून अधिक लोकांना यूकेमध्ये कोविड -19प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT