America RIMPAC Exercise Dainik Gomantak
ग्लोबल

America RIMPAC Exercise: अमेरिका आणि इस्रायलसोबत भारताचा मोठा लष्करी सराव, काय आहे प्लॅन?

RIMPAC Exercise: संपूर्ण जगावर युद्धाचे सावट आहे. चीन आणि अमेरिका यांच्यातील तणावही शिगेला पोहोचला आहे. जगातील बड्या देशांनी आता मोठ्या युद्धाची तयारी सुरु केली आहे.

Manish Jadhav

संपूर्ण जगावर युद्धाचे सावट आहे. चीन आणि अमेरिका यांच्यातील तणावही शिगेला पोहोचला आहे. जगातील बड्या देशांनी आता मोठ्या युद्धाची तयारी सुरु केली आहे. अमेरिका पॅसिफिक महासागरात आपल्या मित्र देशांसोबत जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय सागरी सराव करत आहे.

‘रिम ऑफ द पॅसिफिक’ (RIMPAC) असे या सरावाचे नाव असून, जगभरातील 29 देशांचे सैन्य यात सहभागी होत आहेत. हा युद्धसराव चीन (China) आणि रशियासाठी धोक्याच्या घंटापेक्षा कमी नाही, कारण चीनचे शत्रू देश जपान आणि दक्षिण कोरिया त्यात सामील आहेत. भारतही या कवायतीचा एक भाग आहे.

दरम्यान, RIMPAC दर दुसऱ्या वर्षी आयोजित केले जाते. 1971 मध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि अमेरिकेने याची सुरुवात केली होती.

बहुपक्षीय संबंध मजबूत करणे आणि मुक्त इंडो-पॅसिफिकला प्रोत्साहन देणे हा या कवायतीचा उद्देश आहे. 27 जूनपासून सुरु झालेल्या या सरावात दक्षिण कोरिया, जपान आणि भारताच्या लष्करासह दक्षिण-पूर्व आणि दक्षिण आशिया, लॅटिन अमेरिका आणि सात युरोपीय देशांच्या सैन्यांचाही सहभाग आहे.

या सरावात इस्रायली सैन्यांनीही सहभाग नोंदवला. मात्र इस्त्रायली सैन्यांच्या सहभागावर पॅलेस्टिनी समर्थक संघटनांनी निषेध नोंदवला.

25 हजारांहून अधिक सैनिक आणि 29 देश

या सरावात जगभरातील बलाढ्य सेना आपली जहाजे आणि शस्त्रे घेऊन सहभागी होत आहेत. सुमारे 29 देश, 40 सरफेस जहाज, 3 पाणबुड्या, 14 देशांचे भूदल, 150 हून अधिक विमाने आणि 25 हजारांहून अधिक लष्करी कर्मचारी सहभागी होत आहेत. हा सराव 26 जून ते 2 ऑगस्ट या कालावधीत अमेरिकेच्या (America) हवाई बेटांमध्ये आणि आसपास सुरु राहणार आहे.

मानवतावादी मदत देखील समाविष्ट

RIMPAC केवळ युद्धाच्या दृष्टीनेच नव्हे तर मानवतावादी आणि मदत कार्यांच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. या अभ्यासामध्ये नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्याचा सराव करण्यात आला आहे. अमेरिकेने या प्रदेशात आपले संबंध मजबूत केले आहेत. त्याचबरोबर अनेक नवीन संरक्षण करारांवर अमेरिकेने स्वाक्षरीही केली आहे.

याशिवाय, आशिया पॅसिफिक प्रदेशात आपली लष्करी क्षमता वाढवण्यावरही भर दिला आहे. यावर्षी RIMPAC चे आयोजन वाढत्या प्रादेशिक तणावादरम्यान होत आहे, त्यामुळे त्याला चीनसारख्या देशांचा विरोध होत आहे.

चीननेही या भागात सराव वाढवला

अलीकडेच, चीनने तैवानभोवती आपले लष्करी जाळे अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला. तर ​दक्षिण चीन समुद्रातील विवादित बेटे आणि किनारपट्टीवरुन फिलिपाइन्सशी चीनचा संघर्ष अधिक गडद होत चालला आहे. अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी चीनच्या या भागातील आक्रमकतेला विरोध केला आहे. मात्र या देशांच्य विरोधाला न जुमानता चीनने आपला लष्करी सराव सुरुच ठेवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT