Presence of unseasonal rains in Maharashtra Storm and hail warning from the weather department
Presence of unseasonal rains in Maharashtra Storm and hail warning from the weather department 
देश

महाराष्ट्रात अवकाळी पावसाची हजेरी; हवामान खात्याचा वादळासह गारपीटीचा इशारा

गोमन्तक वृत्तसेवा

नवी दिल्ली : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार काल रात्री व आज सकाळी महाराष्ट्रातल्या विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र उस्मानाबाद, सातारा या भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. देशातील बर्‍याच भागात हिवाळा सुरू असूनदेखील पाऊस व हिमवृष्टीही होत आहे. देशाच्या उत्तर पर्वतीय भागातील पाऊस सुरू असल्याने पठारी भागातील तापमानावरदेखील परिणाम झाला आहे. दरम्यान, गुरुवारी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने (आयएमडी) जारी केला आहे. यावेळी या भागात गारपीटीचीही शक्यता आहे.

आयएमडीच्या म्हणण्यानुसार दक्षिण पूर्व आणि उत्तर पश्चिम मध्य प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या बर्‍याच भागात वादळासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासह वादळ व पावसासह उत्तराखंडमधील काही भागात गारपिटीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भारत हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार ओडिशावर चक्रीवादळाचे सावट आहे. विदर्भातही चक्रीवादळ फिरत आहे.  ही स्थिती पुढील तीन दिवस सक्रिय राहण्याची अपेक्षा आहे. त्याचा परिणाम झाल्यामुळे मध्य आणि पूर्वेकडील राज्यात पाऊस पडेल. अंदमान आणि निकोबार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागात गेल्या 2 तासांत जोरदार गडगडाटासह पाऊस पडला आहे. 

यासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील काही भागात गेल्या चोवीस तासांत हलक्या सरी बरसल्या आहेत.आयएमडीच्या मते, ओडिशामधील सुंदरगड, झारसुगुडा, मयूरभंज, बारीपाडा आणि हंडाळपूरच्या काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्येही पावसाची परिस्थिती निर्माण होत आहे. हवामान खात्याने पूर्व बिहारमधील किशनगंज, अररिया, पूर्णिया, सुपौल, मधेपुरा, कटिहार, सहरसा, भागलपूर, बांका आणि जमुईच्या काही भागात पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

NEET Exam : फर्मागुढीत नव्‍हे, कुंकळ्‍ळीत होणार उद्या ‘नीट’ परीक्षा! ओमप्रकाश जयस्वाल

Missing Case: नोएडातून बेपत्ता झालेल्या लेकीच्या शोधात आई गोव्यात आली, दोन दिवसांत पोलिसांना कसा घेतला शोध?

India Is Not Xenophobic: ‘’भारत हा झेनोफोबिक देश...’’; बायडन यांच्या वक्तव्यावर जयशंकर स्पष्ट बोलले

Margao Garbage : मडगाव परिसरातील झऱ्यांना कचऱ्याचे ग्रहण ; स्थानिकांत संताप

Paris Olympics 2024: ‘’रशिया अन् बेलारुसच्या खेळाडूंशी संपर्क ठेवू नका’’; युक्रेनियन खेळाडूंना आवाहन

SCROLL FOR NEXT