Nikita Jacobs big revelation in the toolkit case and Petition filed for pre-arrest bail
Nikita Jacobs big revelation in the toolkit case and Petition filed for pre-arrest bail 
देश

टूलकिट प्रकरणी निकिता जेकबचा मोठा खुलासा; न्यायालयाने जामीनासाठीच्या याचिकेवरचा निकाल ठेवला राखून 

दैनिक गोमन्तक

केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी धोरणाच्या विरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमारेषेवर मागील दोन महिन्यांच्यापेक्षा अधिक काळ आंदोलन करत आहेत. आणि याच आंदोलनाचा भाग म्हणून प्रजासत्ताक दिनादिवशी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. त्यानंतर या रॅलीला हिंसक वळण लागून घडलेल्या घटनेसंदर्भात आणि सोशल मीडियावरील टूलकिटबाबत दिल्ली पोलीस तपास करत आहेत. याशिवाय कथित टूलकिटच्या प्रकरणावरून दिल्ली पोलिसांनी बंगळुरू मधील पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवी हिला अटक केली असून, मुंबईतील वकील निकिता जेकब आणि पुण्यातील अभियंता शंतनूला अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. यावर निकिता जेकबने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली आहे. 

निकिता जेकबने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या ट्रान्झिट अटकपूर्व जामीन याचिकेत दिल्ली पोलिसांना दिलेल्या निवेदनाचा उल्लेख केला आहे. याशिवाय, संपूर्ण घटनाक्रम देखील आल्याची माहिती मिळाली आहे. तर दुसरीकडे दिशा रवी आणि स्वीडनची पर्यावरण कार्यकर्ती ग्रेट थनबर्ग यांच्यात झालेला सोशल मीडियावरील व्हाट्सअप चॅट उघडकीस आला आहे. आणि याशिवाय, पुण्यातील अभियंता शंतनू दिल्लीच्या टिकरी सीमारेषेवर  20 ते 27 जानेवारीच्या दरम्यान उपस्थित होता, असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. 

वकील निकिता जेकबने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत एका मिटिंग ऍपच्या चर्चेचा उल्लेख देखील केला आहे. या बैठकीत वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील लोक सामील होते आणि ही बैठक शेतकरी आंदोलनाबाबत असून कोणत्याही राजकीय अथवा धार्मिक गोष्टीसाठी होत नसल्याचे जाहीर करण्यात आले होते. शिवाय या बैठकीची माहिती पब्लिक डोमेन मध्ये राहणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले होते, असे निकिता जेकबने यात म्हटले आहे. इतकेच नाही तर, इतर कार्यकर्त्यांप्रमाणेच आपण देखील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात शांततेने सहभागी होण्यासाठी संशोधन आणि मोहीम राबवत असल्याचे निकिता जेकबने सांगितले आहे. त्यामुळे कोणताही राजकीय किंवा धार्मिक हेतू नसल्याचे तिने पुढे म्हटले आहे. आणि दिल्लीतील आम आदमी पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचे पुढे अधोरेखित केले आहे. 

याव्यतिरिक्त, ट्रान्झिट अटकपूर्व जामिनासाठी शंतनूने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे धाव घेतली होती. आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शंतनूला आज 10 दिवसांचा जामीन मंजूर केला असल्याची माहिती मिळाली आहे. तर, निकिता जेकबने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने आपला आदेश राखून ठेवला आहे. दुसरीकडे, दिशा रवी आणि ग्रेटा थनबर्ग यांच्यातील व्हाट्सअप चॅट समोर आला आहे. ज्यामध्ये ग्रेटा थनबर्गने टूलकिट सोशल मीडियाच्या ट्विटरवर अपलोड केल्यानंतर दिशा घाबरल्याचे दिसत आहे. आणि दहशतवादविरोधी कायदा यूएपीएमुळे ती भयभीत झाली होती असे निदर्शनास आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मतदानाच्या एक दिवस अगोदर RGP अध्यक्ष व उत्तर गोवा उमेदवार मनोज परब यांच्याविरोधात गुन्हा का नोंद झाला?

Goa Today's News: भाऊ, तुकाराम विरोधात तक्रार, मंगळवारी गोव्यात दोन लोकसभा जागांसाठी मतदान; राज्यातील ठळक बातम्या

Khalistani Group Funds: खलिस्तानी संघटनेकडून पैसे घेतल्याचा केजरीवालांवर आरोप; नायब राज्यपालांकडून NIA चौकशीची मागणी

Goa News: चला मतदानाला! सिंधुदुर्ग, कारवार आणि बेळगावचे मतदार गावाला रवाना

Kerala High Court: ‘’...बलात्कार करणाऱ्याच्या मुलाला जन्माला घालण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही’’

SCROLL FOR NEXT