indian railways
indian railways  
देश

भारतीय रेल्वेने “श्रमिक स्पेशल” गाड्या चालवून 58 लाख प्रवाशांना पोचवले

Dainik Gomantak

नवी दिल्ली, गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार ,ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरीत कामगार,यात्रेकरी,पर्यटक विद्यार्थी आणि इतरांना आपापल्या ठिकाणी पोचते करण्यासाठी  दि 1 मे 2020 पासून भारतीय रेल्वेने या श्रमिक स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला .

आज दि  3 जून 2020 पर्यंत  देशातल्या विविध राज्यांत एकूण 4197 गाड्या चालवल्या गेल्या. आज सकाळी 9 वाजेपर्यंत  अशा 81 गाड्या  रुळावरून धावल्या. "श्रमिक स्पेशल "गाड्यातून आत्तापर्यंत  58 लाखांपेक्षा जास्त प्रवासी 34 दिवसात आपापल्या राज्यात पोचले आहेत.

या 4197 गाड्या  देशातील विविध राज्यांतून सुरू झाल्या. जास्तीत जास्त गाड्या सुरू करणारी पहिल्या पाच  क्रमांकाची राज्ये आहेत , गुजरात (1026 गाड्या ), महाराष्ट्र (802 गाड्या) , पंजाब ( 416 गाड्या) , उत्तरप्रदेश (294 गाड्या ) ,  बिहार(294 गाड्या) तसेच या श्रमिक स्पेशल गाड्या  ज्या  राज्यांत परतल्या ,त्यातील पहिल्या पाच क्रमांकाची राज्ये  आहेत उत्तरप्रदेश( 1682 गाड्या ),बिहार (1495 गाड्या), झारखंड (197) ओदिशा(187 गाड्या) आणि पश्चिम बंगाल ( 156 गाड्या.

विशेष महत्वाची बाब म्हणजे या गाड्यात आता गर्दी होत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT