Akash Teer: भारत आत्मनिर्भरतेवर लक्ष देत असून यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती करताना दिसत आहे. आता केंद्राच्या संरक्षण मंत्रालयाने गाझियाबादमधील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ( BEL ) सोबत एका करारावर सह्या केल्या आहेत.
बीईएल भारातीय सेनेसाठी एक असे सिस्टिम तयार करत असून जे शत्रूच्या प्रत्येक हल्ला हवेतच रोखू शकणार आहे. या प्रकल्पासाठी बीईएलला 1982 रुपए मिळणार आहेत.
देशाच्या संरक्षणक्षेत्रात वाढ करण्यासाठी ऑटोमॅटिक वायू रक्षा नियंत्रण आणि रिपोर्टिंग प्रणाली तयार करणार आहे. ( (Automated Air Defence Control and Reporting System - AADCRS) सरकारने या प्रकल्पाला आकाश तीर असे नाव दिले आहे.
ऑटोमॅटिक वायू रक्षा नियंत्रण आणि रिपोर्टिंग प्रणाली म्हणजेच असे सेन्सर्स आणि रडार्सचे नेटवर्क आहे जे शत्रूचे विमान, जेट, हेलिकॉप्टर आणि ड्रोनला बघताक्षणीच अलर्ट होऊन भारतीय वायूसेनेच्या संरक्षण युनिटला माहिती पोहचवेल.
या युनिटमध्ये जमीनीवरुन हवेत आणि हवेतून हवेत मारा करणारी मिसाईल आणि रॉकेटस आहेत . मिळालेल्या माहितीनुसार, प्रोजेक्ट आकाशतीर भारतीय सेनेला(Indian Army) युद्धादरम्यान हवेतून कमी उंचीच्या जागांवर लक्ष ठेवण्यास सक्षम असेल. भविष्यात भारतीय सेनेला आकाशतीरची मोठी मदत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.