आयआयटी (IIT) आणि आयसीएमआर (ICMR) या दोन्ही संस्थांना ड्रोन नियम, 2021 अंतर्गत सशर्त सूट देण्यात आली आहे. Dainik Gomantak
देश

ड्रोनद्वारे कोरोना लसीच्या वितरणास ICMRची सशर्त मंजूरी

आयआयटी (IIT) बॉम्बेला त्याच्या कॅम्पसमध्ये संशोधन, विकास आणि चाचणी उद्देशांसाठी ड्रोन (drone) वापरण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: नागरी उड्डयन महासंचालनालयाने (DGCA) सोमवारी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), बॉम्बे यांना ड्रोन (drone) वापरण्यास सशर्त मान्यता देण्यात आली आहे. मानवरहित विमान म्हणजेच ड्रोन केवळ संरक्षण, शेती तसेच ई-कॉमर्स, हवामानशास्त्र, आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रात पुरेशी मदत देत आहे, आता हे आरोग्य क्षेत्रातही (Health sector) सुरू करण्यात येत आहे.

अंदमान आणि निकोबार बेटांवर, मणिपूर आणि नागालँडमधील दुर्गम भागात लस पोहोचवण्यासाठी आयसीएमआरला 3,000 मीटर पर्यंतच्या उंचीवर ड्रोन वापरण्याची परवानगी देण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी तेलंगणाच्या विकाराबादमध्ये पहिला 'मेडिसिन फ्रॉम द स्काय' प्रकल्प सुरू केला ज्या अंतर्गत ड्रोनच्या मदतीने औषधे आणि लस पुरवल्या जातील. आयआयटी बॉम्बेला त्याच्या कॅम्पसमध्ये संशोधन, विकास आणि चाचणी उद्देशांसाठी ड्रोन वापरण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. आयआयटी आणि आयसीएमआर या दोन्ही संस्थांना ड्रोन नियम, 2021 अंतर्गत सशर्त सूट देण्यात आली आहे.

काय आहेत ड्रोन नियम 2021

- ड्रोनची डिजिटल पद्धतीने नोंदणी करणे बंधनकारक आहे.

ड्रोनची उपस्थिती आणि त्यांच्या उड्डाणाची माहिती अनिवार्य आहे.

- ड्रोनमध्ये 250 ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी वजनाचे नॅनो उपकरण बसवता येतात.

- त्यात 250 ग्रॅम ते 2 किलोग्रॅम पर्यंत सूक्ष्म उपकरणे बसवण्याची परवानगी आहे.

- लहान ड्रोनचे वजन - 2 किलो ते 25 किलो

- मध्यम ड्रोन वजन- 25 किलो ते 150 किलो

- मोठे ड्रोन 150 किलो ते 500 किलो

विमान नियम, 1937, 500 किलोपेक्षा जास्त वजनाच्या ड्रोनवर लागू होईल.

ड्रोन उडवण्यापूर्वी, पात्रतेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. जे भारतीय गुणवत्ता परिषद किंवा त्यांच्याकडून / केंद्र सरकारने अधिकृत केलेल्या कोणत्याही संस्थेकडून मिळवता येते.

- ड्रोनचा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (UIN) आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cylinder Scheme: '3 सिलिंडर' योजनेचा 50 हजार महिलांना लाभ, दीड लाख अर्ज; 40 हजार अर्ज पतींच्या नावाने, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Onion Price Goa: कांदा पुन्हा रडवू लागला! पणजी बाजारात किलोमागे 70 रुपये, फलोत्पादन महामंडळाकडून 58 रुपयांत विक्री

Team India World Record: टीम इंडियाचा 'भीमपराक्रम'! टी-20 क्रिकेटमध्ये 200 सामने जिंकणारा भारत ठरला जगातील पहिलाच संघ; रोमहर्षक सामन्यात जपानचा पराभव

Kunal Thakur Success Story: दिव्यांगत्वावर मात करत कुणाल ठाकूर बनले पेडणे पालिकेचे मुख्याधिकारी; शिक्षणासह समाजकार्यातही उमटवला ठसा

Goa Road Accidents: गोव्यात 'वीकएंड' ठरतोय जीवघेणा! ऑगस्टमध्ये 226 अपघात, 20 सप्टेंबरपर्यंत 188 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT