Suraj & Uttarā
Suraj & Uttarā Dainik Gomantak
देश

बायकोच्या हत्येसाठी नवऱ्याचं चक्क 'कोब्रा' हत्यार

दैनिक गोमन्तक

संसार म्हटलं भांड्याला भांड हे वाजतच. हे भांडण किती ताणायचं हे त्या पती पत्नीने ठरवायचं असंत. मात्र पत्नीला कंटाळलेल्या पतीने तिचा जीव घेण्यासाठी खोलीत चक्क कोब्रा जातीचा नाग सोडल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? हो पत्नीला जीवे मारण्यासाठी केरळमधील आरोपी सूरजने कोब्रा जातीच्या नागाचा वापर केला आहे. सूरजवर (Suraj) 25 वर्षीय पत्नी उत्तराचा (Uttara) हुंड्यासाठी छळ करुन हत्या केल्याचा आरोप आहे. कोल्लम सत्र न्यायालयाने (Kollam Sessions Court) या प्रकरणी निकाल दिला असून आरोपी सूरजला बुधवारी शिक्षा सुनावली.

दरम्यान, पत्नी उत्तरा कोल्लमपासून अवघ्या 40 कि.मी. वर असलेल्या तिच्या मामाच्या घरामध्ये राहत होती. झोपेत असतानाच तिला कोब्रा सारखा दिसणारा नाग चावला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना 7 मे 2020 ला घडली. त्यावेळी सूरज-उत्तराच्या लग्नाला दोन वर्षे झाली होती आणि सध्या त्यांना एक वर्षाचे गोंडस बाळ देखील आहे. फिर्यादींनी उत्तराचा पती आरोपी सूरज एस. कुमारवर आरोप केला आहे की, त्याने पत्नीच्या खोलीमध्ये मुद्दाम कोब्रा जातीचा नाग सोडला होता, जेणेकरुन नागाने तिचा चावा घेऊन मृत्यू होईल. हा संपूर्ण कट रचण्यापूर्वी आरोपी सूरजने पत्नीला झोपेच्या गोळ्या दिल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. तपासामध्ये असेही समोर आले आहे की, मागील वर्षी 2 मार्च रोजीही सूरजने पत्नीची हत्या करण्यासाठी घरामध्ये कोब्रा सोडला होता.

तसेच, पथानामथिट्टा जिल्ह्यातील अदूरजवळील पारकोडे येथे आरोपी सूरजच्या घरी असताना उत्तराला कोब्रा जातीचा नाग चावला होता. त्यावेळी तिरवल्ला येथील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तिच्यावर तब्बल 16 दिवस उपचार करण्यात आले होते. रसेल वायपर साप चावल्यामुळे ती पूर्णत:हा आजारी पडली होती. त्यानंतर ती सुमारे 52 दिवस अंथरुणावर पडून होती. उत्तराची प्लास्टिक सर्जरीही करण्यात आली होती. उत्तराच्या आईच्या मतानुसार, तिची मुलगी आणि सूरज जेवणानंतर झोपायला गेले होते. आरोपी सूरजला रात्री उशिरा उठायची सवय होती. पण दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आरोपी सूरज बाहेर गेला. तर दुसरीकडे मात्र उत्तराला नेहमीच्या वेळेला जागच आली नाही. त्यानंतर उत्तराच्या आईला संशय आला आणि ती तडक उत्तराच्या खोलीमध्ये तिला पाहण्यासाठी गेली. त्यावेळी ती बेशुध्दवस्थेत आढळली. नंतर खोलीची झडती घेण्यात आली असता तिथे तिला कोब्रा जातीचा नाग आढळून आला, ज्याला नंतर ठार मारण्यात आले.

सूरज आणि उत्तराच्या लग्नामध्ये आरोपी सूरजला त्याच्या मागणीनुसार हुंडा देण्यात आला होता. दोन वर्षाच्या सूरज आणि उत्तराच्या अयशस्वी लग्नानंतरही त्याने हुंडा मागण्याता प्रयत्न केला, असा आरोपही उत्तराच्या आईकडून करण्यात आला आहे.

शिवाय, उत्तराच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी उपस्थित केलेल्या संशयाच्या आधारावर आरोपी सूरजला २४ मे ला अटक केली. 12 जुलै रोजी सूरजने जाहीरपणे कबूल केले की, त्याने कोल्लममधील परीपल्ली येथील गारुडी सुरेश कुमार याच्याकडून 10 हजार रुपयांना दोन वेळा साप खरेदी केला होता. सुनावणीदरम्यान, त्याने हेतू जाणून घेतल्याशिवाय सूरजला नाग विकल्याचे न्यायालयामध्ये सांगण्यात आले. आरोपी सूरजवर पत्नी उत्तराची हत्या केल्याचा आरोप आहे, तर त्याचे आई-वडील आणि बहिणीवर घरगुती हिंसाचाराचा आरोपही आहे. या धक्कादायक प्रकरणात बुधवारी आरोपी असणाऱ्या सूरजला शिक्षेची सुनवाणी होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT