Court Dainik Gomantak
देश

7 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने दिली फाशीची शिक्षा

Manish Jadhav

Haryana Crime: हरियाणातील कैथल येथील न्यायालयाने 7 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन खून केल्याप्रकरणी दोषीला फाशीची शिक्षा सुनावली. दोषी पवन कुमार उर्फ ​​मोनी (22) हा लोणची विकायचा आणि पीडितेच्या कुटुंबीयांशी त्याची ओळख होती.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा न्यायालयाने दुर्लभ प्रकरण म्हणून घोषित केलेली ही पहिली फाशीची शिक्षा आहे. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश गगनदीप कौर यांच्या विशेष पॉक्सो न्यायालयाने हा निर्णय दिला.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने मृत मुलीच्या कुटुंबीयांना 30 लाख रुपयांची आर्थिक मदतही न्यायालयाने जाहीर केली.

न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले की, 'ज्या व्यक्तीने असे घृणास्पद कृत्य केले आहे, त्याला जगण्याचा अधिकार नाही. या गुन्हेगाराने मुलीवर जे क्रौर्य केले ते सहन न होणारे आहे.

न्यायालयाने पुढे म्हटले की, 'फसव्या आणि पापी व्यक्तीला त्याच्या दिसण्यावरुन ठरवता येत नाही. अॅडॉल्फ हिटलरने 8 दशलक्ष लोकांना फाशीची शिक्षा दिली होती.

लाखो लोकांच्या मृत्यूला तो जबाबदार होता. हे आश्चर्यकारक असू शकते की, त्याला प्राण्यांवरील क्रूरतेचा तिरस्कार होता आणि तो शाकाहारी होता. या आरोपीसारख्या (Accused) लोकांना जगात जगू दिले तर तो इतर कैद्यांची मने निश्चितच कलुषित करेल.'

'फाशीशिवाय दुसरी पर्याप्त शिक्षा नाही'

निकालात न्यायालयाने म्हटले की, 'हल्ल्यातील क्रूरता विसरता कामा नये. ज्या रानटी पध्दतीने मुलीवर बलात्कार, खून आणि नंतर जाळण्यात आले…. या सगळ्यामुळे तिच्या आई-वडिलांना प्रचंड मानसिक त्रास झाला.

त्यामुळे फाशीच्या शिक्षेशिवाय दुसरी कोणतीही शिक्षा पर्याप्त असू शकत नाही, असे न्यायालयाच्या निदर्शनास आले. उपजिल्हा वकील जय भगवान गोयल यांनी सांगितले की, न्यायालयाने कलम 6 पॉक्सो कायदा आणि आयपीसीच्या (IPC) 302 अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावली आहे.

तसेच, त्याला कलम 365 अन्वये सात वर्षांचा कारावास, कलम 366 अन्वये 10 वर्षांचा कारावास आणि कलम 201 अन्वये सात वर्षांचा कारावास ठोठावण्यात आला आहे. दोषीला 13 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

रस्त्यात खेळत असलेल्या मुलीला पळवून नेले

पोलिस तपास अहवालानुसार, आरोपी पवन कुमार हा कलायत पोलिस (Police) स्टेशन हद्दीतील एका गावात राहणारा आहे. इयत्ता 2 ची विद्यार्थिनी रस्त्यावर खेळत असताना आरोपीने तिला पळवून नेले.

मुलगी सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी शोध सुरु केला, मात्र तिचा पत्ता लागला नाही. यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलीचा अर्धा जळालेला मृतदेह जवळच्या जंगलातून सापडला.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपी पवन कुमारपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले आणि त्याला अटक करण्यात आली. डीएसपी सज्जन कुमार यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने 25 तासांत या प्रकरणाची उकल केली.

चौकशीत पवनने मुलीवर बलात्कार केल्याची कबुली दिली आणि नंतर तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून टाकले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT