Fitness certificate for national license to vehicles
Fitness certificate for national license to vehicles 
देश

वाहनांना राष्ट्रीय परवान्यासाठी फिटनेस प्रमाणपत्र

pib

नवी दिल्ली, 

देशभरातील वाहनांना नोंदणीच्यावेळी किंवा फिटनेस प्रमाणपत्र देताना फास्ट टॅग  तपशील मिळविणे सुनिश्चित करण्याचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे. मंत्रालयाने राष्ट्रीय माहिती केंद्राला (एनआयसी) पत्र लिहिले असून त्याच्या प्रति सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवल्या आहेत. त्यात राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल संकलन (एनईटीसी) आणि वाहन पोर्टल (VAHAN) यांचे एकत्रीकरण केल्याची आणि 14 मे रोजी एपीआयसह ते कार्यरत झाल्याचीमाहिती देण्यात आली आहे. वाहन प्रणाली आता वाहन ओळख क्रमांक आणि वाहन नोंदणी क्रमांकाद्वारे फास्टॅगवरील सर्व माहिती मिळवित आहे.

अशाच प्रकारे मंत्रालयाने नवीन वाहनांची नोंदणी करताना तसेच वाहनांना राष्ट्रीय परवान्यासाठी फिटनेस प्रमाणपत्र देताना फास्टॅगची माहिती मिळवणे सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.

एम आणि एन प्रवर्गाच्या वाहनांच्या विक्रीच्या वेळी नवीन वाहनांमध्ये फास्टॅग लावणे 2017 मध्ये अनिवार्य करण्यात आले होते आणि मंत्रालयाने या योजनेबाबत नोव्हेंबर 2017 मध्ये राजपत्र अधिसूचना प्रसिद्ध केली होती. परंतु फास्टॅग बँक खात्याला संलग्नित करण्यात किंवा तो सक्रिय करण्यात नागरिकांकडून केली जाणारी टाळाटाळ याबाबत आता तपासणी केली जाईल. 

संपादन - तेजश्री कुंभार 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

Goa Election 2024 Voting Live: मुख्यमंत्री दक्षिणेत; कामतांसोबत दिल्या मतदान केंद्रांना भेट

Goa Congress: पल्लवी धेंपे, सिद्धेश नाईक मंत्री ढवळीकर यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Israel Hamas War: रफाह शहराच्या सीमेजवळ इस्त्रायलची मोठी तयारी; ‘हा’ मुस्लिम मित्र देश संतापला; नेतन्याहू यांना दिला इशारा

गोवा निवडणूक काळात केजरीवालांचा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, कोणी दिले बिल? ED ची कोर्टात माहिती

SCROLL FOR NEXT