Tajikistan Earthquake
Tajikistan Earthquake Dainik Gomantak
देश

Rajasthan Earthquake: बिकानेरमध्ये जाणावले भूकंपाचे धक्के, रिश्टल स्केलवर 4.2 तीव्रता

दैनिक गोमन्तक

Rajasthan Earthquake: राजस्थानच्या बिकानेरमध्ये आज भूकंपाचे धक्के जाणावले आहे. या भुकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.२ एवढी होती. हा भुकंप मध्यरात्री 2.16 च्या सुमारास झाला. भूकंपाची खोली 8 किलोमीटर होती. अद्याप कोणतेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही.

राजस्थानमधील बिकानेरशिवाय आज (26 मार्च) पहाटे अरुणाचल प्रदेशातील चांगलांग येथे 3.5 तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाची खोली 76 किमी होती. मात्र, यामध्येही कुठलीही हानी झाल्याचे वृत्त नाही.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने यापूर्वी माहिती दिली होती की 25 मार्च रोजी म्यानमारमध्ये 4.0 तीव्रतेचा भूकंप झाला होता. भूकंप म्यानमारमधील बर्माच्या उत्तरेस 10 किमी अंतरावर आणि 106 किमी खोलीवर झाला.

याशिवाय छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये शुक्रवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरजवळ शुक्रवारी सकाळी 10.31 वाजता 4.0 तीव्रतेचा भूकंप झाला.

छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये सकाळी 10:28 वाजता 3.9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. छत्तीसगडमधील अंबिकापूरमध्ये सुमारे सहा सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. अनेक रहिवाशांनी घाबरून इमारतीबाहेर धाव घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT