corona vaccine Dont believe the wrong tweet that goes viral in the name of Nobel laureates Assam Police appeals
corona vaccine Dont believe the wrong tweet that goes viral in the name of Nobel laureates Assam Police appeals 
देश

corona vaccine: नोबेल विजेत्यांच्या नावाने व्हायरल होणाऱ्या चुकीच्या ट्विटवर विश्वास ठेवू नका; आसाम पोलिसांचे अवाहन

दैनिक गोमंतक
आसाम: देशभरात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढत असताना,कोरोनावर प्रतिबंध लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. मात्र अशातच सोशल मीडियावर काही असामाजिक आणि नावाजलेल्या घटकांकडून असा दावा केला जात आहे की लसीकरण करण्यात आलेले लोक दोन वर्षांत  मरण पावतील. यामध्ये फ्रेंच नोबेल (French Nobel) विजेत्या व्यक्तीचे नावदेखील देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात पुढे असेही म्हटले आहे की "ज्या लोकांनी लसीचा डोस घेतलेला आहे. त्यांची जगण्याची शक्यता कमी आहे." लोकांनी अशा बनावट बातम्यांबाबत सतर्क राहण्याची गरज आहे असे ट्विट मेघालय पोलिसांनी केले आहे. 
 
#COVID19 च्या लसीबाबतचा खोटा आणि दिशाभूल करणारा दावा सोशल मीडियावर  फिरत आहे.  यामुळे लोक घाबरले आहेत. आम्ही नागरिकांना विनंती करतो की असे खोटे आणि फेक दावे करणारे  मेसेज फॉरवर्ड करू नयेत तसेच यावर विश्वास देखील ठेऊ नये.


आसाम पोलीस विभागाने लोकांना अशा कोणत्याही प्रकारच्या बनावट पोर्टलवर भेट न देण्याचे अवाहन केले असून, अशाप्रकारच्या बातम्यांची पडताळणी करुन घेण्याचे सांगितले आहे. आसाम पोलिसही लसीकरणाच्या मोहिमेत सामील झाले असून नागरिकांना असत्यापित माहितीचा प्रचार न करण्याचे आवाहन केले.

“व्हॅक्सिनविषयी फ्रेंच नोबेल पुरस्कार विजेते यांनी दिलेला मेसेस दिशाभूल  करणारा आणि चुकीचा असून तो सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.आम्ही नागरिकांना विनंती करतो की या चुकीच्या मेसेजला फॉरवर्डला प्रोत्साहन देऊ नये. लक्षात ठेवा, चुकीची माहिती व्हायरसइतकीच प्राणघातक असू शकते, ”असे आसाम पोलिसांनी ट्विट करत सांगितले आहे. कोरोनाचा उद्रेक होण्यास सोशल मीडियावर, दिशाभूल करणार्‍या आणि चुकीच्या माहितीचा मोठा वाटा आहे.

कोरोना महामारीमुळे जगात आधीच भीती, नैराश्य आणि अराजकातेचे वातावरण आहे. त्यात व्हायरस किंवा लसीकरणाशी संबंधित अशी दिशाभूल करणारी माहिती अधिक अराजकता निर्माण करते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT