Approval for itolizumab restricted emergency use for covid patients
Approval for itolizumab restricted emergency use for covid patients 
देश

कोविड रुग्णांसाठी इटोलिझुमब प्रतिबंधित आपत्कालीन वापरासाठी मंजुरी

pib

नवी दिल्ली,

इटोलिझूमब (आरडीएनए मूळ), एक मोनोक्लोनल अँटीबॉडी असून गंभीर प्लेक सोरायसिससवरील उपचारासाठी यापूर्वी त्यास मंजुरी दिली होती, त्याला आता क्लिनिकल चाचण्यांच्या आकडेवारीच्या आधारे भारतीय औषध महानियंत्रकानी (डीसीजीआय) प्रतिबंधित आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे.

अल्झुमॅब या ब्रँड नावाखाली 2013  पासून मध्यम ते गंभीर स्वरूपाच्या प्लेक सोरायसिस असलेल्या रूग्णाच्या उपचारासाठी मेसर्स बायोकॉन या औषधाची निर्मिती आणि विपणन करत आहे. हे देशी औषध आता कोविड -19 साठी पुन्हा वापरण्यात येणार आहे.

मेसर्स बायोकॉनने कोविड  -19  रूग्णांवर दुसऱ्या टप्प्यात केलेल्या  क्लिनिकल चाचणीचे  निष्कर्ष डीसीजीआयकडे सादर केले आहेत. डीसीजीआयच्या कार्यालयात विषय तज्ज्ञ समितीमध्ये या चाचण्यांच्या निष्कर्षांवर विस्तृत चर्चा  करण्यात आली.

मृत्यूचा प्राथमिक एंडपॉइंट , फुफ्फुसाचे कार्य उदा. पिएओ 2 आणि ओ 2 (PaO2 and O2) सॅच्युरेशनमध्ये सुधारणा आदी तपशील सादर करण्यात आला. आयएल -6, टीएनएफ α इत्यादी प्रमुख इनफ्लॅमेटरी मार्कर  आदी सादर करण्यात आले. कोविड -19 रूग्णांमध्ये अति-जळजळ रोखण्यात हे औषध उपयुक्त ठरल्याचे आढळले.

सविस्तर चर्चा आणि समितीच्या शिफारशी विचारात घेतल्यानंतर,    मध्यम ते गंभीर तीव्र श्वसनाचा त्रास असलेल्या कोविड -19 बाधित रूग्णांमधील सिटोकिन रिलीज सिन्ड्रोम  (CRS) च्या उपचारासाठी डीसीजीआयने प्रतिबंधित आपत्कालीन वापराअंतर्गत औषध विपणनाला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र रूग्णांची संमती, जोखीम व्यवस्थापन योजना, केवळ रुग्णालयात वापर यांसारख्या अटींचे पालन अनिवार्य असेल.

संपादन - तेजश्री कुंभार 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT