research on agriculure
research on agriculure 
देश

गव्हाच्या वैकल्पिक जनुकांचा वापर शक्य, पुणे स्थित आघारकर संशोधन संस्थेने शोधले उपाय

pib

नवी दिल्ली, 

भारतामध्ये दरवर्षी भातपिक घेतल्यानंतर जवळपास तेवीस दशलक्ष टन अवशेषाची म्हणजे, तांदूळ तयार झाल्यानंतर राहिलेल्या चोथ्याची-पेंढ्याची विल्हेवाट कशी लावावी, हा मोठा प्रश्न निर्माण होतो. यावर उपाय म्हणून शेतकरी तांदळाचा वाळलेला भुसा जाळून टाकतात. मात्र त्यामुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचते. वातावरणामध्ये या जळीत पेंढ्यांच्या कणांचे अवशेष दीर्घकाळ असतात. वातावरणामध्ये कोरडेपणा येतो. शेतकरी तांदूळ काढल्यानंतर त्या शेतात गव्हाचे पीक घेतात. त्यामुळे गव्हाच्या कोणत्याही वाणाला कोरड्या वातावरणात अंकूर फुटणे आणि तो वाढणे, एक आव्हान असते.

या अडचणीवर मात करण्यासाठी पुण्याच्या आघारकर संशोधन संस्थेने (एआरआय) उपाय शोधून काढले आहेत. ‘एआरआय’ ही संस्था विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत स्वायत्तपणे कार्यरत आहे. संशोधकांनी गव्हामध्ये असलेल्या आरएचटी 14 आणि आरएचटी 18 या दोन वैकल्पिक लहान जनुकांचे नकाशे तयार केले आहेत. ही जनुके चांगल्या वाणाच्या बियाणांपासून तयार केलेली आहेत. जोमदार व जास्त लांबीची ही जनुके कोलेप्टलशी जोडलेली असल्यामुळे नव्या अंकुरांचे संरक्षण करू शकतात.

आघारकर संशोधन संस्थेतल्या ‘जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडींग – एआरआय’ समुहाच्यावतीने या विषयात संशोधन करण्यात येत असून त्याचे नेतृत्व संशोधक डॉ. रवींद्र पाटील करीत आहेत. या संशोधनामध्ये गव्हाच्या गुणसूत्रांचे नकाशे तयार केले असून गहू प्रजनन प्रक्रियेमध्ये या जनुकांच्या चांगल्या निवडीसाठी ‘डीएनए’ आधारित चिन्हके तयार केली आहेत. त्यामुळे वैकल्पिक लहान अनुवंशिकता वाहकांच्या मदतीने गव्हाच्या विशिष्ट प्रजनन प्रक्रियेत सहभागी होणे शक्य ठरणार आहे. या संशोधनाविषयी ‘द क्रॉप जर्नल अँड मॉलेक्यूलर ब्रीडिंग’मध्ये माहिती प्रकाशित झाली आहे.

अशा प्रकारे ‘डीएनए’च्या आधारे चिन्हीत करून जनुकांच्या हस्तांतरणाचा प्रयोग भारतातल्या अनेक गव्हांच्या वाणांमध्ये करण्यात येत आहे. त्यामुळे तांदळाचा भुसा म्हणजे राहिलेला पेंढा जाळल्यानंतर निर्माण होत असलेल्या कोरड्या वातावरणात पेरणीसाठी उपयुक्त असलेल्या गव्हाचे वाण मिळू शकणार आहे. हे वाण तयार करण्याचे काम आता अगदी प्रगत टप्प्यावर आले आहे.

या वैकल्पिक लहान जनुके असलेल्या गव्हाच्या ओंब्या वातावरणातला कोरडेपणा कमी करण्यास मदत करतील. जमिनीतल्या आर्द्रतेचा लाभ घेण्यासाठी गहू बियाणांची खोलवर पेरणी करण्याचा उपायही आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे.

हरित क्रांतीच्या काळामध्ये संशोधित झालेल्या थोड्या मोठ्या म्हणजे गहू बियाणाच्या पारंपरिक बियाणापेक्षा थोड्याशा लहान गव्हाचे बियाणे सध्या उपलब्ध आहे. यामध्ये आरएचटी 1 समावेश आहे. या बियाणांमुळे जोमदार पीक येते.  मात्र या पारंपरिक बियाणांची कोरड्या वातावरणात पेरणी खोलवर करून चालत नाही. कोरड्या हवेचा त्यांच्या अंकुरण्याच्या प्रक्रियेवर प्रभाव होतो. आधीच्या पिकांचे शेतजमिनीमध्ये राहिलेल्या अवशेषांमुळे अंकुरण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो.

भातपिकाची काढणी केल्यानंतर राहिलेला त्याचा पेंढा, इतर अवशेष जाळले जात असल्यामुळे त्याचा वातावरण, शेतातली माती आणि मानवी आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो. म्हणून गहू सुधार कार्यक्रमामध्ये वैकल्पिक छोट्या जनुकांचा समावेश करण्याची गरज निर्माण झाली आहे. भारतामध्ये आरएचटी 1 या छोट्या जातींचा गहू प्रामुख्यांने पिकवला जातो. देशातल्या गहू पिकवणा-या विविध भागांमध्ये छोट्या जनुकांच्या अनुवंशिक पायामध्ये विविधता आणण्याची आवश्यकता आहे.

एआरआयमध्ये करण्यात आलेल्या अनुवंशिकता अभ्यासामध्ये गव्हाच्या रोपांमध्ये वाढीसाठी जोमदारपणा टिकवून ठेवताना गव्हातली आरएचटी14 आणि आरएचटी18 या जनुकांना आरएचटी 1च्या तुलनेत रोपांची उंची कमी करणे शक्य झाले आहे. मात्र अंकुराच्या लांबीवर त्याचा परिणाम होत नाही. यामध्ये खोलवर पेरणी करण्याची गरज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT