ShareChat Lay Off
ShareChat Lay Off Dainik Gomantak
देश

ShareChat Lay Off: फेसबूक, ट्विटरनंतर आता 'या' भारतीय कंपनीतूनही कर्मचारी कपात

Akshay Nirmale

ShareChat Lay Off: मंदीचे कारण देत अॅमेझॉन, फेसबुक-मेटा, ट्विटर या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली होती. तोच राग आता भारतीय कंपन्याही आळवत चालल्या आहेत. भारतीय सोशल मीडिया अॅप असलेल्या शेअरचॅटने त्यांच्याकडील अनेक कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. या कंपनीतून 100 जणांना कमी करण्यात आले आहे. कंपनीने त्यांचा फँटसी स्पोर्ट प्लॅटफॉर्म Jeet 11 देखील बंद केला आहे.

शेअरचॅटला मोहल्ल टेक प्रायव्हेट लिमिटेडद्वारे ऑपरेट केले जाते. या कंपनीला फंडिंग करणाऱ्यांमध्ये गुगल, ट्विटर, स्नॅप आणि टायगर ग्लोबल या कंपन्यांचा समावेश आहे. जगभरातील टेक कंपन्या त्यांच्या उद्योगाचे री स्ट्रक्चर करत आहेत, त्यातच शेअरचॅटबाबत ही बातमी समोर आली आहे. शेअरचॅटमध्ये एकुण 2300 कर्मचारी आहेत.

सध्या शंभर लोकांना कमी केले गेले आहे. आम्ही नियमितपणे कंपनीच्या कामाचा आढावा घेत असतो. ही नियमित प्रक्रिया असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. Jeet11 सह काही फंक्शन्स बंद केले आहेत, असे कंपनीने म्हटले आहे.

शेअरचॅट भारतातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया कंपनी आहे. या कंपनीच्या सर्व प्लॅटफॉर्मवर 40 कोटी मासिक सक्रीय युजर्स आहेत. अंकुश सचदेवा, भानु प्रताप सिंह आणि फरीद एहसान यांनी 2015 मध्ये शेअरचॅटची सुरवात केली होती. त्यांचा Moj नावाचाही एक प्लॅटफॉर्म आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT