Supreme Court: इस्त्रो वैज्ञानिक नंबी नारायण यांना हेरगिरी प्रकरणात फसवणाऱ्या आरोपींना सुप्रिम कोर्टाचा झटका

नंबी नारायण यांना 1994 मध्ये इस्त्रोमधील हेरगिरी प्रकरणात फसवण्यात आले होते.
Supreme Court of India
Supreme Court of IndiaDainik Gomantak

इस्त्रोच्या हेरगिरी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली.नंबी नारायण यांना हेरगिरी प्रकरणात फसवणाऱ्या आरोपींची पूर्व याचिका रद्द केली आहे.सर्वोच्च न्यायालयाने केरळच्या उच्च न्यायालयाला इस्त्रो हेरगिरी प्रकरणातील मुख्य आरोपींच्या जामीन याचिकेवर नव्या पद्धतीने विचार करुन पुन्हा निर्णय देण्याचा आदेश दिला आहे.तसेच, सर्वोच्च न्यायालयाने पुढील कारवाईपर्यंत आरोपींना संरक्षण मिळेल,असे म्हटले आहे.

दरम्यान ,केरळ उच्च न्यायालयाने पाच मुख्य आरोपींना जामीन मंजुर केला होता.ज्यामध्ये पोलीस आणि आयबी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केल्यानंतर सीबीआयने या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.नंबी नारायण यांना 1994 मध्ये हेरगिरी प्रकरणात फसवण्यात आले होते.ज्यामध्ये एस.विजयन, थम्पी एस दुर्गादत्त,आरबी श्रीकुमार आणि एस जयप्रकाश यांचा समावेश आहे.सुप्रिम कोर्टाने म्हटले आहे की ,उच्च न्यायालयाने चार आठवड्यात या जामीन अर्जावर पुन्हा सुनावणी करुन निर्णय द्यावा .पाच आठवड्यापर्यत आरोपींना अटक करु नये. जस्टिस एमआर शाह यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना हे प्रकरण पुन्हा हायकोर्टाकडे जाऊ शकते असा संकेत दिला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com