Savitribai Phule
Savitribai Phule Dainik Gomantak
ब्लॉग

समाजाप्रती समर्पण भाव ठेवणारी लेखिका

दैनिक गोमन्तक

गोवा: नमन जेव्हा सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलत असते, तेव्हा ती सावित्रीबाईंची एक एक जळजळीत लेक असल्यासारखी भासते असे संगीता म्हणते. संगीता नाईक नमनची मैत्रीण आहे पण केवळ नमन आपली मैत्रीण आहे म्हणून हे उद्गार तिच्या तोंडून येत नाहीत. नमनला तिने लोकांच्या सभेत बोलताना ऐकले आहे. स्त्रियांचे प्रश्न आक्रमकतेने मांडताना पाहिले आहे. संगीता म्हणते, नमन जितकी आक्रमक आहे, तितकीच ती सौम्य आणि समजूतदारही आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, नमनच्या स्त्रीवादाने, तिच्या ग्रामीण परिसरातून आकार घेतला आहे. ते सोपे नव्हते. पण त्यामुळेच तिच्या स्त्रीवादी भूमिकेला एक वास्तववादी पाया लाभला आहे. तिचा स्त्रीवाद उथळ किंवा आक्रस्ताळा नाही आणि हाच वास्तववादी आणि व्यवहारी पाया नमनच्या लेखनातही प्रतिबिंबित झालेला दिसतो.

नमन ‘केवळ लिहिणारी’ लेखिका नाही. तिने स्वतःला ‘कार्या’तही झोकून दिले आहे. गोव्यात तिने अनेक सामाजिक उपक्रमात भाग घेतलेलाच आहे. दूर, बाबा आमटे यांच्या आनंदवनात जाऊन, तिथल्या आजारी लोकांचीही तिने सेवा केली आहे. त्यानंतर बाबा आमटे यांच्या कामाबद्दल इतरांत जागरूकता आणण्याचा प्रयत्नही तिने केला. नमनने ग्रामीण महिला, विद्यार्थी आदींसाठी समानता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावाद या संकल्पना स्पष्ट करणारी व्याख्यानेही दिली आहेत.

लेखक प्रकाश पर्येकर नमनबद्दल बोलताना म्हणतात, ती वैचारिक अधिष्ठान असलेली आणि सांस्कृतिक भान असलेली लेखिका आहे. आपल्या कार्याने आणि लेखनाने समाजासमोर ती कायम सकारात्मक विचार मांडत आली आहे. आपल्या भोवती जे अनिष्ट आहे, त्यावर आपल्या भाषणाने प्रहार करण्यास ती मागे पुढे पाहत नाही. पण ती समाजाची स्पंदनेही ओळखते आणि त्यानुसार आपले काम पुढे नेते.

स्त्रियांच्या समस्यांची जशी नमनला जाणीव आहे, तशीच जाणीव आणि कळकळ तिला विद्यार्थ्यांबद्दलही आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेल्या आत्महत्येचे प्रमाण लक्षात घेऊन, अशा मनोवृत्तीविरुद्ध जागृती करण्याच्या प्रयत्न करण्याच्या दृष्टीने, मानसतज्ञ आणि समाजकार्यकर्त्यांच्या मदतीने, विद्यार्थ्यांना आपल्या ताण-तणावावर मात करण्यास मदत होईल अशा प्रकारची सत्रे तिने आयोजित केली आहेत.

समाजाचे प्रत्यक्ष भान असलेली कार्यकर्ती आणि लेखिका असलेली नमन सावंत धावस्कर, पर्वरी येथील ‘विद्या प्रबोधिनी महाविद्यालया’त 26 आणि 27 मार्च रोजी आयोजित होणाऱ्या 21 व्या युवा साहित्य संमेलनाची अध्यक्षा म्हणून सन्मानाने निवडली गेली आहे. केवळ शब्दांचा भार न वाहता, समाजाभिमुख प्रतिबद्धतेने आपले विचार आपल्या साहित्याद्वारे मांडणारी लेखिका नमन सावंत धावस्कर, या संमेलनाची समर्पक अध्यक्षा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT