Organizing an art exhibition 'Gopakpatnam se Goa'
Organizing an art exhibition 'Gopakpatnam se Goa' Dainik Gomantak
ब्लॉग

गोपाकपट्टणम से गोवा

गोमन्तक डिजिटल टीम

Organizing an art exhibition 'Gopakpatnam se Goa' आज आपण आपल्या प्रदेशाला गोवा या नावाने ओळखतो, पण कधीकाळी या प्रदेशाचा उल्लेख गोपाकपट्टण, गोपाकपट्टणम असाही होत असे. ‘गोपाकपट्टणम’ या शब्दाचा उल्लेख महाभारतातही आला आहे.

‘गोपाकपट्टणम’ पासून ‘गोवा’ बनेपर्यंत हा प्रदेश वेगवेगळ्या स्थित्यंतरातून गेला आहे. अश्मयुगीन काळानंतर या प्रदेशाने शेती युगात प्रवेश केला व त्यानंतर सुरुवातीच्या सभ्यतेच्या काळात कुंभारकला, शेतीची अवजारे व हस्तकला यांचा उगम इथल्या माणसांच्या जीवनात झाला.

त्यानंतरच्या कालखंडात या प्रदेशात उदयाला आलेल्या साम्राज्यांनी कला, वास्तुकला आणि साहित्याचा समृद्ध वारसा मागे ठेवला ज्याच्या काही खुणा या प्रदेशात अजूनही स्पष्टपणे दिसतात.

हा समृद्ध वारसा गोव्याच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय आयामांची आकर्षक वेलबुट्टी बनून राहिला आहे.

गोव्याच्या या कलात्मक वारशाला प्रतिसाद म्हणून वार्का येथील क्लब महिंद्रा रिसॉर्टने आपल्या अनवाईंडिंग लाउंजमध्ये ‘डिस्कव्हर इंडिया कला प्रदर्शन- सीझन २’च्या अंतर्गत ‘गोपाकपट्टणम से गोवा’ या कला प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. हे प्रदर्शन ‘कलेच्या माध्यमातून शोध भारताचा (गोवा)’ या संकल्पनेवर आधारित आहे.

अस्सल, प्रादेशिक पण जागतिक कला आणि संस्कृतीशी नाते सांगणाऱ्या नामवंत गोमंतकीय कलाकारांच्या कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.

या प्रदर्शनाच्या क्युरेटर वेंडी कुतिन्हो म्हणतात, “देशाच्या तसेच जगाच्या कानाकोपऱ्यांतून लोकांना आपले हे राज्य आकर्षित करते. या प्रदर्शनाद्वारे, प्रेक्षकांच्या मनात या प्रांताच्या दीर्घ आणि गुंतागुंतीच्या इतिहासाचा शोध घेण्याची उत्सुकता निर्माण होईल.

विविध माध्यमे आणि स्वरूपांतून सादर झालेल्या या समकालीन कला प्रदर्शनामधून गोव्याचा समृद्ध वारसा समजून घेतानाच, गोव्याने अनुभवलेला सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय प्रभावांचे दर्शनही आकर्षकपणे होऊ शकेल.’

गत शतकांत गोव्याच्या झालेल्या वाटचालीचे सौंदर्य, त्यातली जटिलता तसेच आजच्या गोव्याचे संस्कृतिक महत्त्व जाणून घेण्यास ‘गोपाकपट्टणम से गोवा’ या माध्यमातून प्रेक्षकांना मदत होऊ शकेल.

गोव्याचा वारसा, संस्कृती आणि इतिहास याचा प्रभाव सांगणारी, गोव्यातील नामवंत कलाकारांनी तयार केलेल्या चित्रकृती, कलाकृती, शिल्पे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.

सुबोध केरकर, विराज नाईक, आशिष फळदेसाई, चैताली मोरजकर, स्वीटी जोशी, मिधुन मोहन, भिसाजी गडेकर, प्रदीप नाईक, शैलेश दाभोळकर, सिधान कुंडईकर, श्रीपाद गुरव, सोनिया रॉड्रिग्ज साबरवाल आणि लेटिसिया अल्वारिस ह्या नामवंत कलाकारांच्या कलाकृती या प्रदर्शनात समाविष्ट आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT