Dainik Gomantak
Dainik Gomantak
ब्लॉग

गोव्यातील पुष्पलताची 'नाटकाशी' असलेली बांधिलकी

दैनिक गोमन्तक

पुष्पा शाळेत शिकत असतांनाच नाटकात काम करण्याची संधी तिला मिळाली व तीसुद्धा त्या नाटकातली नायिका म्हणून. नाटकाचं नाव होते, ‘कहाणी कोणा एका मानवाची’. त्यावेळी पुष्पाचं वय होतं अवघे तेरा वर्षे. पूर्वी गावागावात जत्रा-उत्सवाच्यावेळी तिथे नाटके सादर व्हायची. त्यात फक्त स्त्री कलाकार ही बाहेरची, व्यवसायिक कलाकार असायची. त्या गावात जायचा प्रवास खूप त्रासदायकच असायचा. गावात जाण्यासाठी एखादीच बस असायची. बस बदलत गावात पोहोचेपर्यंत चार-पाच तास लागायचे. एखादे वेळी बस चुकल्यास भाड्याच्या मोटर सायकलने, स्वत:चे पैसे खर्च करून जावे लागायचे. पण ठरलेल्या वेळी पोहोचणे हे महत्वाचे असायचे. ठरवलेली वेळ किंवा दिवस चुकला आहे हे आपल्या बाबतीत घडलेले नाही हे पुष्पा अभिमानाने सांगते.

आपल्या काळात पुष्पा एका महिन्यात तीस-तीस नाट्यप्रयोगात काम करायची. गणेशचतुर्थीच्या दरम्यान नाटकांच्या मोसमाला सुरूवात व्हायची. एका मोसमात (वर्षात) पुष्पा शेकडो वेगवेगळ्या नाटकात कामे करायची. आपल्या नाटकात काम करण्यासाठी आयोजक तिच्या घरी तालमीच्या आणि नाटकाच्या दिवसासबंधी निरोप देऊन जायचे (कारण पुष्पा घरी नसायची. ती कुठल्यातरी गावात प्रयोग करत असायची). त्यावेळी आताच्यासारखे फोन नव्हते. पुष्पा घरी आल्यावर तिला तो निरोप मिळायचा. मग पुष्पा त्या ठरलेल्या दिवशी, त्या गावात तालीम किंवा नाटकासाठी (Drama) पोचायची. हे सारे विश्वासावर पार पडायचे. त्याकाळची ती एकप्रकारची व्यवस्था होती.

पुष्पा सांगते, ज्या गावात नाटक असायचे, तिथल्याच कुणाच्या तरी घरी रहायची व्यवस्था व्हायची. सारेच अनोळखी असायचे. त्या घरात ज्येष्ठ महिला असेल तर तिच्याकडून मुलीसारखे वागवले जायचे. घरात जर मुली असतील तर बहिणीसारखे नाते जुळायचे. चांगलं उत्साही वातावरण मिळालं तर त्याचा परिणाम नाटक चांगलं होण्यात व्हायचा. एकामागोमाग एक नाटकाचे प्रयोग असले तर झोपायलासुद्धा फुरसत नसायची. रात्री उशिरा नाटक संपलं की सकाळी उठून लगेच दुसऱ्या गावच्या प्रवासाला सुरुवात व्हायची. ‘नाटक’ हेच तिच्या कमाईचे साधन होते. त्यामुळे तिने ‘नाटकाशी’ इमान राखले.

पुष्पाचे गाव शिरोडा असले तरी तिचे कुटुंब त्या काळात मडगांवला (Margao) रहायचे. त्यामुळे तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवातच मडगाव शहरातून झाली. ‘पिंपळकट्टो’ , ‘कोम्बा’ ‘फातोर्डा’ (Fatorda) या भागात होणार्या नाटकांमधून तिने सुरुवातीला नाटकात कामे आवड म्हणुन, मानधन न स्विकारता केली. पण नंतर नोकरी करण्यापेक्षा नाटक हेच आपले कार्यक्षेत्र म्हणून स्विकारावे असे तिने ठरवले. तिला मिळालेले पहीले मानधन होते 150 रुपयांचे, नाटक होते, ‘माझा कुणा म्हणू मी?’ त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. तिचे शेवट्चे नाटक होते, कोरोनापूर्व काळात मार्च महिन्यात झालेले, ‘दुरितांचे तिमीर जावो’ आणि त्याचे तिला मिळालेले मानधन होते 8000 रुपये. ‘आधी खूप त्रास काढले पण त्याचं फळ मला पुढे मिळाले. मी या क्षेत्रात समाधानी होते. ‘पुष्पलता शिरोडकर’ या नावाची ओळख सबंध गोव्यात (Goa) नाटकामुळेच झाली.’ असे ती सांगते.

‘मत्स्यगंधा’, ‘ययाती देवयानी’, ‘अमृत मोहिनी’ ह्या नाटकाचे प्रत्येकी 400 प्रयोग गोवा आणि कर्नाटकाल्या (Karnatak) गावात झालेले आहेत. तिला तिने साकारलेली ‘मत्स्यगंधा’ या नाटकातली ‘सत्यवती’ची भूमिका फार आवडते. नाटकात तिला नयना आपटे, मेघा गोगटे, वैशाली राजशेखर अशा अनुभवी कलाकारांचे मार्गदर्शन मिळाले आहे. त्याचप्रमाणे गोव्याचे सूर्या वाघ, काशिनाथ शिरोडकर, तातोबा वेलिंगकर या अनुभवी नाट्यदिग्गजांकडून मार्गदर्शन लाभले आहे. ‘असुनी नाथ मी अनाथ’ या स्पर्धेच्या नाटकात दिल्लीच्या प्रेक्षकांनीसुद्धा तिचे खूप कौतुक केले. अशाप्रकारच्या कौतुकामुळे आपण नाटकात अधिक चांगला अभिनय केला पाहिजे याची जाणीव तयार होते असं तिला वाटते

एक नाट्य कलाकार म्हणून कला अकादमीच्या ‘कृष्णभट बांदकर’ व रवींद्र भवनच्या ‘दत्ताराम वळवईकर’ या पुरस्कारांनी (Award) ती सन्मानित झाली आहे. त्याशिवाय अनेक गावातून तिथल्या नाट्यकलाकारांनी तिला सन्मानित केले आहे. एक नाट्य (Drama) कलाकार म्हणून कला आणि सांस्कृतिक (Culture) संचालनालयातर्फे तिला मासिक मानधन मिळते. कलेच्या क्षेत्रात तिने काम केल्याची ही पावती आहे असे तिला वाटते.

- भारती बांदोडकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

SCROLL FOR NEXT