warsa .
warsa . 
ब्लॉग

वारशाच्या खुणा जपणारे ‘लिव्हिंग इन द पास्ट’ प्रदर्शन

गोमन्तक वृत्तसेवा

पणजी: बेंगळूरु येथील आदित्य सदाशिव या तरुणाची किमया
बेंगळूरु येथील सेंट जोसेफ महाविद्यालयातून व्हिज्युअल कम्युनिकेशन मध्ये पदवी प्राप्त केलेला बेंगळूर येथील चौवीसतला तरुण आदित्य सदाशिव याने कर्नाटक शासनाच्या कन्नड व संस्कृती खात्याच्या सौजन्याने गोरा राज्य वस्तू संग्रहालयात (जुने सचिवालय, आदित्य शहा, पैलेस, पणजी) ‘लिव्हिंग इन द पास्ट’ हे पेन आणि शाई व जलरंगतील आपले वारसा चित्रप्रदर्शन भरविले आहे.

एकेकाळी वापरण्यात येणाऱ्या वस्तू आज आपल्या वारसा खूणा म्हणूनच शिल्लक आहेत.अशात अशा वस्तू एखाद्याच्या संग्रही असणे ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे.मात्र नव्या पिढीतील आदित्यने या वस्तू आपल्या चित्रांच्या माध्यमातून सर्वांसमोर आणल्या आहेत.केशकर्तनालयामधील टीपिकल लाकडी खुर्ची, पूर्वी वापरला जाणारा पेट्रोमॅक्स दिवा, जुनी पारंपरिक कौलारु घरे, जुना टाईपरायटर, पूर्वी गुड्डीचा सोडा बनवला जायचा ते यंत्र, हॉटेलमध्ये वापरली जाणारी जुनी टाईपरायटर, पूर्वी गुड्डीचा सोडा बनवला जायचा. ते यंत्र, हॉटेलमध्ये वापरली जाणारी जुनी किटली, जुना रेडिओ अशा गोष्टी आदित्यने चित्रांकिता करून जुन्या वारसा वस्तूंना उजाळा दिला आहे.

असे आगळ प्रदर्शन भरविण्याचा आदित्यने ख्यातनाम सिने टोग्राफर ए. एस्‌. कनाल यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट दिग्दर्शन व संकलन अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे.त्याने माहिती पटही बनवले आहेत.तो सतत कला आणि कला समीक्षा यामध्ये मग्न असतो.

आदित्य तांत्रिक तत्त्वज्ञानाचा वारसा यावर सध्या अभ्यास करत आहे.वारसा सांगणारे जुने दरवाजे यावरही त्याला प्रदर्शन करायचे आहे.त्याच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन प्रथितयश चित्रकार, रंगकर्मी व बांबोळकर आर्ट गॅलरीचे संचालक श्रीधक कामत बांबोळकर यांच्या हस्ते झाले.यावेळी सन्माननीय पाहुण्या म्हणून प्रसिद्ध वास्तू शास्त्रज्ञ तथा लेखिका प्रीता सरदेसाई व प्रमुख पाहुण्या म्हणून राज्य वास्तू संग्रहालयाच्या संचालक तथा नामवंत कवयित्री राधा भावे तसेच प्रथितयश चित्रकार हर्षदा केरकर उपस्थित होत्या.हे प्रदर्शन २९ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० पर्यंत रसिकांसाठी खुले आहे.

हस्तशिल्प हंरिजेट व्हिलेजमधून प्रेरणा मिळाली
विजयनाथ शणॉय यांनी मणिपाल येथे हस्तशिल्प हेरिटेज व्हिलेज वसवले आहे.त्यात सुमारे तीनशे वर्षापूर्वीची जुनी वारसा घरे, कर्नाटक, हैद्राबादमध्ये होवून गेलेले राजे महाराजे, जुनी उपकरणे, अशा वारसा सांगणाऱ्या गोष्टी आहेत.हे सर्व पाहून मी भारावून गेलो आणि माझे वारसा विषयक पहिले एकल प्रदर्शन भरविण्याची प्रेरणा मला इथूनच मिळाली.आमच्या पिढीला मला हे दाखवायचे आहे.कर्नाटक आणि गोव्यात वारसा स्थळांचे साम्य आहे.आणि वारसा वस्तूंवरील माझे पहिले चित्र प्रदर्शन आदिलशहा पॅलेस मध्ये वस्तू संग्रहालयाच्या ऐतिहासिक वास्तूत भरविता आले हे मी माझे भाग्य समजतो.गोमंतकीय नामवंत चित्रकार हर्षदा केरकर व राज्य वस्तू संग्रहालयाच्या संचालक राधा भावे यांनी मला मोलाचे सहकार्य केले, असे आदित्य सदाशिव यांनी सांगितले.


 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रादो 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT