SBI Bank, SBI guidelines for preventing phishing frauds
SBI Bank, SBI guidelines for preventing phishing frauds Dainik Gomantak
अर्थविश्व-

'अशा' प्रकारचा मेसेज येत असेल तर लगेच बँकेशी संपर्क साधा

दैनिक गोमन्तक

मुंबई : जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. SBI ने आपल्या अंदाजे 45 कोटी ग्राहकांसाठी एक महत्वाची माहिती जारी केली आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना फसवणूक टाळण्याचे आवाहन केले आहे. बँकेने यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. (State Bank of India has informed that avoid the suspicious of any e-mail, text message or phone call)

बँकेने काय म्हटले? (SBI guidelines to prevent phishing frauds)

SBI ने आपल्या अधिकृत वेबसाइटवर लिहिले आहे की, प्रिय ग्राहक.. तुम्ही आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात! त्यामुळे सुरक्षित डिजिटल बँकिंग अनुभवासाठी या गोष्टी लक्षात ठेवा.

1. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, म्हणजे ई-मेल/एसएमएस वरून मिळालेल्या लिंकवर

2. SBI कधीही तुमची वैयक्तिक माहिती विचारणारी कोणतीही लिंक पाठवत नाही.

3. तुमचा पासवर्ड/कार्ड क्रमांक/CVV/OTP सारखी आर्थिक माहिती असणाऱ्या गोष्टी SBI कधीही ग्राहकाकडे मागत नाही. त्यामुळे त्या तुम्ही कोणाशीही शेअर करू नका.

4. बक्षिसे/लॉटरी/आयकर परताव्याच्या ईमेल/एसएमएसने फसवनूक होऊ शकते, नक्की तो आयकर परताव्याचा (Income tax return) आहे का याची खातर जमा करा.

5. कृपया नियमित अंतराने तुमचा पासवर्ड बदलत राहा.

6. असे कोणतेही अॅप (App) डाउनलोड करू नका ज्याचा अज्ञात व्यक्तीने सल्ला दिला असेल. त्या मेसेजवर क्लिक केल्यानंतर तुमच्या बँकेचे तपशील फसवणूक (Fraud) करणाऱ्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

येथे ग्राहक तक्रार करतात

SBI चे नाव वापरून संशयास्पद ई-मेल/एसएमएस आला असेल तर तक्रार करण्यासाठी तुम्ही report.phishing@sbi.co.in वर लिहू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT