Support price of ripe coconut announced by Central Government
Support price of ripe coconut announced by Central Government 
अर्थविश्व

पक्व नारळाचे समर्थन मूल्य केंद्र सरकारकडून घोषित

pib

मुंबई: केंद्र सरकारने पूर्ण पिकलेल्या आणि सोललेल्या नारळाचे 2020 च्या हंगामासाठी किमान समर्थन मूल्य (एमएसपी) प्रति क्विंटल 2700 रूपये घोषित केले आहे. 2019 च्या  हंगामामध्ये पक्व नारळाचे मूल्य 2,571 रूपये प्रति क्विंटल होते. या तुलनेत यंदा सरकारने समर्थन मूल्यामध्ये 5.02 टक्के वाढ केली आहे.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की, मोदी सरकारने देशभरामध्ये प्रत्येक स्तरावर सर्व कृषी उत्पादकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पिकलेल्या आणि सोललेल्या नारळाचे समर्थन मूल्य वाढवण्यात आल्यामुळे नवीन नारळाच्या खरेदीमध्ये सुगमता येईल. त्याचबरोबर नारळाच्या लाखो लहान शेतकरी बांधवांना वाढीव समर्थन मूल्याचा लाभ मिळू शकणार आहे.

देशात लहान प्रमाणावर नारळाचे उत्पादन घेवून विक्री करणाऱ्या शेतकरी बांधवांना आपल्या पातळीवर नारळ एकत्र करणे आणि त्याचे खोबरे बनवण्यासाठी व्यवस्था तयार करणे सामान्य गोष्ट नाही. वास्तविक सुक्या खोबऱ्यासाठी 2020 च्या हंगामासाठी सरकारने 9960 रुपये प्रति क्विंटल असा दर घोषित केला आहे. सोललेल्या आणि पक्व झालेल्या नारळासाठी घोषित केलेला आत्तापर्यंतचा सर्वात जास्त दर आहे. सुके नारळ म्हणजेच खोबरे तयार केले तर नारळ उत्पादकांना रोख पैसा मिळण्याची हमी असते. मात्र ज्यांच्याकडे नारळ पूर्ण सोलून ते वाळवून त्याचे सुके खोबरे तयार करण्यासाठी पुरेशा सुविधा नसतात आणि ज्यांच्याकडे आलेले पिक साठवून ठेवण्याची क्षमता नसते, त्यांना तुलनेने कमी दरामध्ये सोललेले नारळ विकावे लागतात. अशा नारळ उत्पादकांना या वाढीव समर्थन मूल्याचा लाभ होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर किमान 10-15 राज्यातील सरकार कोसळतील - पवन खेरा

Margao News : मतदानाला प्रेरित करण्‍यास पॅरा ग्‍लायडर्सचा वापर : आश्‍वीन चंद्रू

Heavy Rainfall in Brazil: ब्राझीलमध्ये पावसाचा कहर, दक्षिणेकडील राज्यात 10 जणांचा मृत्यू; राज्यपालांनी दिला आपत्तीचा इशारा

Goa Loksabha Election: ‘सायलंट’ मतदार दाखवणार करिष्मा; फोंड्यात ‘गोमन्तक-टीव्ही’ महाचर्चा

Margao District Hospitals : जिल्हा रुग्णालयाचे खासगीकरण रद्द करणार : विरियातोंचे आश्वासन

SCROLL FOR NEXT