Share Market
Share Market  
अर्थविश्व

Share Market: भांडवली बाजाराचा सेन्सेक्स 1000 हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीत देखील मोठी घसरण 

दैनिक गोमन्तक

आठवड्याच्या पहिल्याच सत्रात देशातील भांडवली बाजाराने मोठी घसरण नोंदवली आहे. मागील आठवड्याच्या चारही सत्रात भांडवली बाजारातील दोन्ही निर्देशकांनी मोठी पडझड नोंदवली होती. त्यानंतर आज चालू आडवड्याच्या पहिल्याच सत्रात देखील शेअर बाजार मोठ्या अंकाने कोसळला आहे. देशातील सर्वात जुन्या मुंबई भांडवली बाजाराच्या सेन्सेक्सने आज तब्बल 1145.44 अशांनी घसरण नोंदवली. तर राष्ट्रीय भांडवली बाजारातील निफ्टी देखील 306.05 ने खाली आला. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या बीएसई निर्देशांकाने आज 50 हजाराचा आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या एनएसईने 15 हजाराचा स्तर सोडला. सेन्सेक्स आज एकाच दिवशी 2.25 टक्क्यांनी व निफ्टी 2.04 टक्क्यांनी खाली आला.       

भांडवली बाजारातील सेन्सेक्सने आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 15.78 अंशांची बढत घेऊन 50905.54 वर उघडल्याचे पाहायला मिळाले. तर निफ्टी देखील 17.30 अंशांनी वाढून 14999.05 वर खुला झाला. मात्र त्यानंतर शेअर बाजारातील दोन्ही निर्देशकांनी घसरण नोंदवण्यास सुरवात केली. यापूर्वी मागील आठवड्याच्या पाचव्या सत्रात म्हणजेच शुक्रवारी सुद्धा भांडवली बाजाराने मोठी घसरण नोंदवली होती. यावेळी मुंबई शेअर बाजाराचा बीएसई निर्देशांक 434.93 अंकांनी खाली येत 50,889.76 वर बंद झाला होता. व राष्ट्रीय शेअर बाजाराचा एनएसई निर्देशांक 137.20 ने घसरत 14,981.75 वर स्थिरावला होता.  

मागील आठवड्याच्या पहिल्या सत्रात भांडवली बाजारातील दोन्ही निर्देशकांनी मोठी उसळी नोंदवली होती. परंतू त्यानंतर बाहेरील गुंतवणूकदारांसह देशातील गुंतवणूकदारांनी नफेखोरीचा पर्याय स्वीकारला होता. आणि त्यामुळे आठवड्याच्या दुसऱ्या सत्रापासून भांडवली बाजाराने मोठी घसरण नोंदवण्यास सुरवात केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळेस मुंबई शेअर बाजाराचा एनएसई जवळपास 1200 अंकांनी आणि निफ्टी 300 अंकांहून अधिक खाली आला होता. मात्र आज चालू आठवड्याच्या पहिल्याच सत्रात सेन्सेक्स 1145.44 अंकांनी खाली येत 49,744.32 वर बंद झाला. व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 306.05 अशांनी घसरून 14,675.70 वर स्थिरावला. 

जाणकारांच्या मते आज भांडवली बाजार गुंतवणूकदारांच्या नफेखोरी आणि देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणाच्या चिंतेमुळे कोसळल्याचे म्हणणे आहे. आज एसबीआय, अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज ऑटो, मारुती सुझुकी, पॉवरग्रीड, महिंद्रा अँड महिंद्रा, एशियन पेंट, भारती एअरटेल, आयटीसी, सन फार्मा, बजाज फायनान्स, लार्सन अँड टुब्रो, टेक महिंद्रा, टायटन, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, डॉ. रेड्डीज, एनटीपीसी, टीसीएस, एचसीएल टेक आणि टाटा मोटर्सचे समभाग घसरणीसह बंद झाले. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT