post office ATM card rules Dainik Gomanatak
अर्थविश्व

तुम्हाला पोस्ट ऑफिस ATM कार्ड व्यवहाराचे नियम माहित आहेत का?

पोस्ट ऑफिस बचत खातेधारकाने कोणत्याही पोस्ट ऑफिसच्या एटीएममधून पैसे काढल्यास त्याला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

दैनिक गोमन्तक

अल्पबचतीसाठी पोस्ट ऑफिस (Post Office) च्या योजना विश्वसनिय आणि सुरक्षित असतात. सर्वसामान्य जनतेला पोस्ट ऑफिसच्या योजना लोकप्रिय आहे. यातच पोस्ट ऑफिस बचत खात्यावर आपल्या ग्राहकांना एटीएम कार्ड (ATM) सुविधा देखील देते आहे. जर तुम्ही पोस्ट ऑफिस एटीएम कार्डसाठी नुकताच अर्ज केला असेल, तर कार्ड बनवण्याआधी, तुम्हाला त्यासोबतच्या व्यवहारांचे नियम आणि मर्यादा माहित असणे आवश्यक आहे. याच्या मदतीने तुम्ही या एटीएम कार्डचा योग्य वापर करू शकाल.

रोख पैसे काढण्याची मर्यादा

पोस्ट ऑफिस बचत खातेधारकाने कोणत्याही पोस्ट ऑफिसच्या एटीएममधून पैसे काढल्यास त्याला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. पोस्ट ऑफिस एटीएम कार्डद्वारे, मेट्रो शहरात 3 विनामूल्य व्यवहार (आर्थिक आणि गैर-आर्थिक दोन्ही) आणि नॉन-मेट्रो शहरात 5 विनामूल्य व्यवहार केले जाऊ शकतात. जर तुम्ही मोफत व्यवहार मर्यादेनंतर इतर बँकेच्या ATM मधून पैसे काढले तर तुम्हाला 20 रुपये + GST ​​शुल्क भरावे लागेल.

पोस्ट ऑफिस बचत खाते उघडणे सोपे

तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडायचे असेल तर ते खूप सोपे आहे. हे खाते फक्त 500 रुपयांमध्ये उघडता येते. तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुमचे खाते उघडू शकता. विशेष म्हणजे पोस्ट ऑफिसमधील बचत खात्यात जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला 4 टक्के वार्षिक व्याजही मिळते.

इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटनुसार, पोस्ट ऑफिस बचत खात्याशी लिंक केलेल्या एटीएम कार्डमधून तुम्ही दररोज जास्तीत जास्त 25000 रुपये काढू शकता. याशिवाय, प्रति व्यवहार म्हणजे एटीएममधून 10,000 रुपये काढता येतात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

Goa News Live Updates: पर्ये सुरी हल्ला प्रकरण; आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

SCROLL FOR NEXT