Finance Minister Nirmala Sitharaman  Dainik Gomantak
अर्थविश्व

KCC असलेल्या शेतकऱ्यांना बँकांकडून होणार मोठा फायदा , अर्थमंत्र्यांची घोषणा

Nirmala Sitharaman on KCC: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी किसान क्रेडिट कार्ड असलेल्या शेतकऱ्यांसाठी बँकांना आवाहन केले आहे.

दैनिक गोमन्तक

तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खुप महत्वाची आहे. तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार सतत प्रयत्न करत असते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना खेड्यातील लोकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) धारकांना सुलभ कर्ज देण्यास सांगितले आहे. (Nirmala Sitharaman on KCC News)

* किसान क्रेडिट कार्ड योजनेचा आढावा घेतला

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांशी (CEO) झालेल्या बैठकीत सीतारामन यांनी प्रादेशिक ग्रामीण बँकांना (Bank) तंत्रज्ञान अपग्रेड करण्यात मदत करण्यास सांगितले. बैठकीनंतर मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला म्हणाले की, वित्तमंत्र्यांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा (KCC) आढावा घेतला आहे. या क्षेत्राला संस्थात्मक कर्ज कसे उपलब्ध करून देता येईल यावर चर्चा केली आहे.

* कृषी कर्जामध्ये ग्रामीण बँकेची महत्त्वाची भूमिका:

अर्थ राज्यमंत्री भागवत के कराड म्हणाले, 'अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मासेमारी (Fishing) आणि दुग्ध व्यवसायात गुंतलेल्या सर्वांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) देण्यावर चर्चा झाली.' "प्रादेशिक ग्रामीण बँकांवरील दुसर्‍या सत्रात, प्रायोजक बँकांनी त्यांना डिजिटायझेशन आणि तंत्रज्ञान सुधारण्यात मदत करावी, असा निर्णय घेण्यात आला," ते म्हणाले. प्रादेशिक ग्रामीण बँकांची कृषी कर्जामध्ये महत्त्वाची भूमिका असते. त्याच्या प्रायोजक बँका सार्वजनिक क्षेत्रातील बँका (PSBs) आणि राज्य सरकारे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार देशात एकूण 43 आरआरबी आहेत. यापैकी एक तृतीयांश RRB, विशेषत: ईशान्य आणि पूर्वेकडील प्रदेश, तोट्यात आहेत आणि 9 टक्के नियामक भांडवलाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी त्यांना निधीची आवश्यकता आहे. या बँका RRB कायदा, 1976 अंतर्गत स्थापन करण्यात आल्या आहेत आणि त्यांचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील लहान शेतकरी, कृषी कामगार आणि कारागीर यांना कर्ज आणि इतर सुविधा उपलब्ध करून देणे हे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Canacona: बाजार करण्यासाठी नेले, दुपट्ट्याने पत्नीचा गळा आवळून केला खून; गोव्यातून गेला बिहारला, संशयिताची झाली निर्दोष सुटका

Goa Team Cricket Captain: गोव्याच्या महिला संघासाठी नवी कर्णधार! विनवी गुरव हिच्याकडे नेतृत्व; T20 मोहीमेला होणार सुरुवात

Goa Live News: अमित पाटकर यांनी केजरीवालांवर निशाणा साधला!

Ronaldo Goa Visit: 'रोनाल्डो' गोवा दौऱ्यावर येणार का? माहिती अजूनही गुप्त; आगमनाबाबत साशंकता

Goa Politics: ‘आरजी’सोबत युतीचा निर्णय चर्चेनंतर', माणिकराव ठाकरेंची स्पष्टोक्ती; राज्‍यभरात काम सुरू केल्याची दिली माहिती

SCROLL FOR NEXT