Money
Money Dainik Gomantak
अर्थविश्व

Investment Tips: 'या' 5 प्रकारे करा पैशाचे नियोजन अन् व्हा चिंतामुक्त

दैनिक गोमन्तक

Money Making Tips: अनेक लोक पैसे कमण्याच्या मागे लागत असतात. यासाठी अनेक पर्याय देखील शोधत असतात. मिळालेल्या पैशांचा योग्य वापर आणि योग्य गुंतवणूक केली तर तुम्ही अधिक श्रीमंत बनू शकता.

फक्त त्यासाठी आलेल्या पैशांची (Money) गुंतवणूक योग्य पद्धतीने केली पाहिजे. यासाठी आज आम्ही तुम्हाला पाच असे मार्ग सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही श्रीमंत बनू शकाल. श्रीमंत होण्यासाठी या पाच पद्धती तुम्हाला नक्की मदत करू शकतात.

  • स्मार्ट उद्दिष्ट्ये ठेवावे

2023 मध्ये तुमची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी स्मार्ट आर्थिक नियोजन आवश्यक आहे. स्मार्ट पद्धतीने योग्य नियोजन केले तर तुम्ही तुमच्या उद्दिष्टापर्यंत नक्की पोहोचाल.

  • योग्य ठिकाणी गुंतवणूक करा

आपल्याकडे असणारा पैसे (Money) वाढवायचा असेल तर त्यासाठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. परंतु गुंतवणूक करतांना ती योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी. गुंतवणूक करताना जोखीम ओळखणे महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे पैसे कमावण्यासह ते गुंतवायचे. कोठे हे देखील समजले पाहिजे.

  • खर्चाचा मागोवा घ्यावा

तुम्ही दरमहा किती पैसे कमावता? किराणा सामान, वीज बिल, इंटरनेट कनेक्शन आणि फोन बिल यावर तुम्ही किती पैसे खर्च करता? तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती असलीच पाहिजे. जेणेकरून तुम्ही बचत करू शकता आणि त्यानुसार गुंतवणूक (Investment ) करू शकता. अशा पद्धतीने दर महिन्याला खर्चाचा मागोवा घेतला तर तुमची चांगली बचत होईल.

  • कर्जाची परतफेड

कर्जाची (Loan) परतफेड शक्य तितक्या लवकर केली पाहिजे. कारण तुम्हाला क्रेडिट कार्ड किंवा बँकेच्या (Bank) कर्जावर दरमहा ईएमआय भरावा लागतो. अशा पद्धतीने तुम्ही कर्ज भरले तर तुम्ही गुंतवणूक करू शकणार नाही. त्यामुळेच शक्य तितक्या लवकर कर्जाची परतफेड करा.

  • पोर्टफोलिओ तपासा

तुमचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला फक्त गुंतवणूक करण्यापेक्षा आणखी बरेच काही करावे लागेल. त्यातील महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ महत्वाचा आहे. कोणत्याही गुंतवणुकीत बदल करायचा असेल तर प्रथम आपला पोर्टफोलिओ पाहावा, असा सल्ला गुंतवणूक सल्लागार देतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT