interests on small saving schemes are re-established
interests on small saving schemes are re-established 
अर्थविश्व

सामान्य गुंतवणूक दारांना दिलासा; अल्पबचत योजनांचे व्याजदर पुन्हा कायम

गोमन्तक वृत्तसेवा

नवी दिल्ली:  केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी (ऑक्‍टोबर ते डिसेंबर 2020) अल्पबचत योजनांचे व्याजदर कायम ठेवले आहेत. सलग दुसऱ्या वेळी व्याजदरकपात न केल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. 
पहिल्या तिमाहीत सरकारने व्याजदरात मोठी कपात केली होती. त्यावेळी या योजनांच्या व्याजदरात 0.70 टक्के ते 1.40 टक्के इतकी मोठी कपात केल्याने गुंतवणूकदारांना मोठी झळ बसलेली होती. 
अल्पबचत योजनांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), किसान विकास पत्र (केव्हीपी), मुदत ठेव (टीडी), मासिक प्राप्ती योजना (एमआयएस),  आवर्ती ठेव (आरडी), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस), सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय) आदी योजनांचा समावेश होतो.  या योजना प्रामुख्याने पोस्टाच्या तसेच निवडक बॅंकांच्या माध्यमातून राबविल्या जातात आणि या योजनांवरील व्याजदराचा तिमाही आढावा घेण्यात येतो. 
अल्पबचत योजनांचे व्याजदर -
पीपीएफ -  7.1 टक्के 
एनएससी -  6.8 टक्के 
केव्हीपी - 6.9 टक्के  (124 महिन्यांत दुप्पट)
पाच वर्षीय टीडी - 6.7 टक्के 
एमआयएस -  6.6 टक्के 
आरडी- 5.8 टक्के 
एससीएसएस-  7.4 टक्के 
एसएसवाय - 7.6 टक्के 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

Arjun Parab Passed Away: ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन परब यांचे निधन

SCROLL FOR NEXT