Rumdamol News: रुमडामळ येथील बेकायदेशीर आस्थापनांवर कारवाई करा, परेश नाईक यांची मागणी

रुमडामळ पंचायतीतही 90 टक्के व्यवसायिक आस्थापना बेकायदेशीररित्या चालवली जात असल्याचे दवर्ली जिल्हा पंचायतचे सदस्य परेश नाईक यांनी सांगितले.

राज्य सरकारने बेकायदेशीर अस्थापनांविरोधात काही दिवसांपूर्वी धडक कारवाई केली होती. रुमडामळ पंचायतीतही 90 टक्के व्यवसायिक आस्थापना बेकायदेशीररित्या चालवली जात असल्याचे दवर्ली जिल्हा पंचायतचे सदस्य परेश नाईक यांनी सांगितले. त्यांनी दक्षिण गोवा कलेक्टसह संबंधित विभागांना बेकायदेशीररित्या चालवल्या जाणाऱ्या अस्थापनांविरोधात धडक कारवाई करण्याची मागणी केली. रुमडामळ पंचायत या बेकायदेशीर अस्थापनांविरोधात कारवाई करत नसल्याचेही नाईक यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com