Video
Panaji News: कायदा व सुव्यवस्थेच्या बिघाडावर आप शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पुरती ढासळली असल्याचे अमित पालेकर म्हणाले.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून आसगाव घर मोडतोड प्रकरणं चांगलंच गाजत आहे. खुद्द राज्याचे डीजीपी जसपाल सिंग यांची या प्रकरणातील भूमिका संशयास्पद आहे. या प्रकरणात कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. तसेच, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पुरती ढासळली असल्याचे अमित पालेकर म्हणाले. पालेकर म्हणाले की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत आपण राज्यपालांची भेट घेणार आहोत. लवकरात लवकर यासंबंधी कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.