Pooja Sharma: 'ना चेहरा दाखवला, ना एक शब्द बोलली', पूजा शर्माची नो कमेंट्स भूमिका

Assagao House Demolition Case: राज्यभर गाजलेल्या आसगाव घर मोडतोड प्रकरणी पूजा शर्माने पहिल्यांदाच चौकशीसाठी हजेरी लावली.

आसगाव घरमोडतोड प्रकरणातील मुख्य संशयित पूजा शर्मा अखेर तीस दिवसानंतर चौकशीसाठी हजर राहिली. पूजा शर्माने अटकपूर्व जामीनासाठी केलेल्या अर्ज प्रकरणी तिला दिलासा मिळाला असला तरी तिला चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना न्यायालयाने केली होती.

यानंतर सोमवारी (दि.२२ जुलै) पूजा गुन्हे शाखेच्या एसआयटीसमोर पूजा चौकशीसाठी हजर होती. चौकशीसाठी आलेली पूजाने चेहरा स्कार्फ आणि गॉगल व तोंडाला मास्क लावून पूर्णपणे झाकला होता. तसेच, प्रसारमाध्यमांनी तिला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता तिने नो कमेंट्स अशी भूमिका घेतली.

याप्रकरणी पूजा शर्मा एक गूढ बनून राहिली होती. पूजा कोण, ती दिसते कशी याबाबत काहीच माहिती उपलब्ध नव्हती दरम्यान, पूजा चौकशीसाठी हजर राहीली मात्र तिने काहीही प्रतिक्रिया देण्यासाठी नकार दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com