Watch Video: रणबीर कपूरला झालं तरी काय? चाहत्याचा फोन फेकून दिल्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल

रणबीरचा एक व्हिडिओ सध्या शोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Watch Video
Watch VideoDainik Gomantak

Ranbir Kapoor Viral Video: बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेता रणबीर कपूरचा एख व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. सार्वजनिक ठिकाणी गेला की चाहत्यांची एका फोटोसाठी किंवा सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांची गर्दी होतेच.

अनेकदा गर्दीला थांबवण्यासाठी बॉडीगार्डला हस्तक्षेप करावा लागतो. पण प्रत्येकवेळा अशीच परिस्थिती असेल असे होत नाही. अनेकदा यामुळे रणबीर कपूर ट्रोलही झाला आहे. आता रणबीर कपूरचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत रणबीर कपूर त्याच्यासोबत सेल्फी काढणाऱ्या मुलाचा मोबाईल फोन फेकून देतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी रणबीरला ट्रोलही केले आहे. पण रणबीरने फोन का फेकला? हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

  • नेमकं काय झालं ?

रणबीर कपूरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये एक चाहता रणबीरसोबत सेल्फी काढत असल्याचे दिसत आहे. पण अनेकदा प्रयत्न केल्यानंतरही त्याला व्यवस्थित सेल्फी काढता येत नाही. दोन ते तीन वेळा असे झाल्यानंतर रणबीर कपूरला राग अनावर होतो, त्यामुळे तो तरुणाच्या हातून फोन घेतो अन् फेकून देतो.

व्हिडीओमागील सत्य काय आहे? हे जाणून न घेता नेटकरी कमेंट्स करत आहेत. एका युजर्सने म्हटलेय की,' आणखी करा बॉलिवूडला सपोर्ट....' दुसऱ्या एका युजर्से म्हटलेय की, 'बरोबर केले... इतके का फोटो काढले.' लोकांना माहित नाही, की हे लोकं किती घंमड करतात.. तरीही लोक त्यांच्या पाठीमागे असतात.

असे एका युजर्सनं म्हटलेय. तर एका युजर्सने म्हटलेय,आणखी करा यांना फोलो तर काही नेटकऱ्यांनी म्हटले की, हा जाहिरातीचा अथवा प्रमोशनचा फंडा आहे. तर अन्य एका युजर्सने म्हटले की, ही जाहिरात आहे ही. ज्यामुळे रणबीरला लोक ट्रोल करत आहेत. ट्वीटरवर सध्या #angryranbirkapoor हा ट्रेंड सुरु आहे. #angryranbirkapoor हा हॅशटॅग वापरुन नेटकऱ्या आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com